27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयगौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

गौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कारण सध्याचं राजकीय वातावरण हे फारच गढूळ झालं असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काहीन् काही अन्वयार्थ लावला जात आहे. एका बाजूला उद्योजक गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात भेट (Gautam Adani And Sharad pawar Meet) झाली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी धारावी विकासकामांबद्दल (Dharavi Redevelopment) आदाणीविरोधात मोर्चा काढला आहे. यामुळे शरद पवार आणि अदाणींच्या भेटीवरून राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवार आणि उद्योजक गौतम अदाणी यांच्यात भेट

दिवसभर शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. अदाणींनी अचानक भेटीसाठी बोलावल्याने ते रात्री ९ वाजता आपल्या मुंबईच्या सिल्वर ओक येथे भेटायला आले. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी भेटीमागचं नेमकं कारण उलघडलं नसल्याचं समजत आहे. दरम्यान शरद पवार आणि अदणी यांच्या भेटीमध्ये धारावी पुनर्विकसाबाबत चर्चा झाली काय? असा देखील अंदाज लावला जात आहे. तसेच शरद पवार हे अदाणी आणि उद्धव ठाकरे यांच्या धारावीच्या प्रकल्पामध्ये मध्यस्ती आहेत की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. यावर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा

सुप्रिया सुळे पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

३१ डिसेंबरला हॅंग ओवर होणाऱ्यांचं ओझं हॉटेल मालक आणि ड्रायव्हरच्या खांद्यांवर

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, विहिंपचे मोठे मन

काय म्हणाले संजय राऊत?

अदाणी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत माध्यमांनी विचारलं असता संजय राऊत उत्तरले शरद पवार आमि अदाणीची भेट याचा महाविकास आघाडीला काय फरक पडणार आहे. याचा काय संबंध आहे? अदाणी हा कळीचा मुद्द नाही. धारावीबाबत ज्या अटी आहेत. त्यबाबत आमचा विरोध असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. कोण कोणाला भेटतंय यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही. शरद पवार अदाणी यांचे जुने संबंध आहे. त्यामुळे ते भेटले असतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा अदाणीविरोधात मोर्चा

धारावी पुनर्विकासाबाबत अदाणीविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला होता. यावर अदाणीला धारावीचा प्रकल्प दिला मात्र झोपडपट्टीवासियांना काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांना ५०० स्क्वेअर फुटाचं घर द्यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी