27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमुंबईमुस्लिम मुलीची श्रीरामाच्या जयघोषात दर्शनासाठी पायी आयोध्यावारी

मुस्लिम मुलीची श्रीरामाच्या जयघोषात दर्शनासाठी पायी आयोध्यावारी

देशामध्ये अनेक वर्षापासून राम मंदिराचा मुद्दा जसाच्या तसाच होता. कित्येक पिढ्या तसेच कित्येक हिंदू तरूण या आंदोलनामध्ये मारले गेले. अनेक तरूणांनी या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये आपले रक्त सांडलं आहे. मात्र आता आयोध्येमध्ये श्रीरामाची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातून अनेक मंडळी जाणार आहेत. तर काही उद्योजक, मनोरंजनविश्वातील अनेक मंडळी उपस्थिती दाखवणार आहे. तर देशातून काही राम भक्त पदयात्रा करत आहेत. अशातच आता मुंबईची मुस्लिम मुलगी शबनम शेख देखील आपले मित्र विनीत पांडे आणि रमण राज शर्मा पदयात्रा करत आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

शबनम ही मुळ मुंबईमध्ये राहणारी आहे. मिळालेल्या माहितीनूसार नालासोपारा येथून तिनं श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आयोध्येला जात असल्याचं सांगितलं आहे. काळा बुरखा, पाठीवर बॅग, त्यावर जय श्रीराम असं लिहिलेलं, मुंबई ते आयोध्या यात्रा एक मुस्लिम मुलगी भगवा झेंडा फडकत आयोध्येला चालली आहे. मी सनातनी मुस्लिम असल्याचं ती म्हणाली आहे. श्रीरामाच्या दर्शनाची आस मनात ठेऊन मी मुंबई ते आयोध्या पायी प्रवास सुरू केला असल्याचं शबनम म्हणाली.

हे ही वाचा

गौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

सुप्रिया सुळे पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

३१ डिसेंबरला हॅंग ओवर होणाऱ्यांचं ओझं हॉटेल मालक आणि ड्रायव्हरच्या खांद्यांवर

नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट

शबनम शेख ही श्रीरामाच्या दर्शनासाठी आयोध्येला चालली आहे. ती आयोध्येला जात असताना इतर काही शहरांच्या मंदिरांमध्ये ती जात आहे. राज्यामध्ये सर्वाधिक धार्मिक स्थळं हे नाशिकला आहेत. यामुळे शबनम पदयात्रा करत नाशिकला गेली. तिनं काळाराम मंदिरामध्या जाऊन दर्शन घेतलं आहे. त्यानंतर आता मुंबई महामार्गाच्या दिशेने रवाना झाली आहे. मुस्लिम मुलगी दर्शनासाठी मंदिरामध्ये आली हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

लहानपणापासून मला श्रीरामाच्या दर्शनाला जायचं होतं. म्हणून आता आयोध्येला पदयात्रा करत जात आहे. लहानपणापासून प्रभू श्रीरामाबद्दल मी वाचन केलं आहे. यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनामध्ये अस्था निर्माण झाली आहे. यामुळे मी श्रद्धेपोटी मी आयोध्येला पदयात्रा करत असल्याचं शबनम शेख म्हणाली आहे. मी आयोध्येत उद्घाटनापर्यंत पोहचणार नाही हे मला माहित आहे. मात्र उद्घाटनानंतर मला दर्शन भेटेल असं शबनम म्हणाली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी