31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळे पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

सुप्रिया सुळे पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

आगामी लोकसभा निवडणुकांवरून आता राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत आहे. एका बाजूला जागा वाटपावरून वाद चालू आहे तर दुसरीकडे राम मंदिराला धरून राजकारण करत असल्याच्या चर्चा आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत फुट झाल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट अधिकच पेचात आहे. यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये खासदारकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेचा (Baramati Loksabha) प्रचार करण्यासाठी तत्पर आहेत. यावर आता सुप्रिया सुळे यांनी आपल्या घरी मुलांना मी १० महिने मुंबईला न येणार असल्याचं सांगितलं आहे. देशाच्या हितासाठी आगामी निवडणूक फार महत्त्वाची असल्याचं त्यांनी इंदापूर येथील कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितलं आहे.

२ जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी बंड केलं होतं. यामुळे आता शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये वादविवाद सुरू आहे. अशातच आता लोकभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात आत्तापासूनत प्रचाराला सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर राज्यामध्ये ४८ जागांमधून प्रत्येक पक्ष तयारीला लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. या ४८ सर्वाधिक चर्चेचा आणि प्रभावी मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. याच मतदारसंघामध्ये दादा गटाचा मतदार उतरणार की, भाजप इतर पर्याय निवडणार अशी चर्चा सुरू आहे. अशातच दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमध्ये रणशिंग फुंकलं आहे. आपल्या परिवाराला आगामी निवडणुकीसाठी पुढील १० महिने तरी येणार नसल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा

३१ डिसेंबरला हॅंग ओवर होणाऱ्यांचं ओझं हॉटेल मालक आणि ड्रायव्हरच्या खांद्यांवर

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, विहिंपचे मोठे मन

आयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात ‘या’ पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

सत्ता म्हणजे अमित शहा आणि संघर्ष म्हणजे शरद पवार

इंदापूरच्या सभेमध्ये बोलत असताना सत्ता आणि संघर्षावरून त्यांनी उदाहरण दिलं आहे. मी सत्ता आणि संघर्षातून संघर्षाला निवडलं. सत्ता म्हणजे अमित शहा आणि संघर्ष म्हणजे शरद पवार असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांबद्दल काही भावनिक वक्तव्य केलं आहे. ज्याने जन्म दिला त्याला कधीच विसरता कामा नये.कोणी करी खरं बोलायला हवं. सगळेच जर घाबरू लागले तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी