मुंबई

‘लय भारी’चे धाडस तरूणांसाठी प्रेरणादायी : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘लय भारी’ या वेब पोर्टलच्या कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत झाले. कोरोनाच्या निर्बंधामुळे मोजक्या २०-२५ लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात आणि ‘लय भारी’चे व्यवस्थापक शांताराम गारुले यांनी दोघांचे स्वागत केले. महसूल मंत्री थोरात आणि धनंजय मुंडे यांनी ‘लय भारी’च्या बातमीदारीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या (Revenue Minister Thorat and Dhananjay Munde lauded the news of Lay Bhari and wished them well).

याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, ‘लय भारी’ या वेब पोर्टलने मागील एक-दीड वर्षातच वाचकांची मोठी पंसती मिळवत भरारी घेतली. वेबपोर्टलवर इतरत्र ज्या बातम्या वाचायला, पाहायला मिळत नाहीत त्या बातम्या असतात. हेच वेगळे वैशिष्ट्ये ‘लय भारी’ला नव्या उंचीवर घेऊन जाईल. ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांना मी गेल्या १०-१२ वर्षापासून ओळखतो. ग्रामीण व साताऱ्यातील माणसारख्या दुष्काळी भागातून येऊन आज आमच्या मित्राने मुंबईतील फोर्टसारख्या भागात ‘लय भारी’चे कार्यालय सुरु केले याचा अभिमान वाटतो. मुंबईसारख्या ठिकाणी असे धाडस करणे सोपे नाही. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी हे प्रेरणादायी ठरू शकते (This can be an inspiration for unemployed youth in rural areas).

‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंंडे

मी शिक्षणमंत्री असताना तुषारजी शिक्षण बीट सांभाळत होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या बातम्या, विषय हे हटके असायचे. बातमीदारी करताना ज्याला ‘बिटवीन द लाईन’ म्हणतात ते विषय समोर आणायचे. आज ‘लय भारी’ मध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येते. वृत्तपत्राच्या जशा जिल्हानिहाय आवृत्ती असतात तशाच पद्धतीने ‘लय भारी’ने सुद्धा जिल्ह्याजिल्ह्यात बातमीदारी करून ग्रामीण भागातील समस्या मांडून विकासाला हातभार लावावा. समस्या मांडल्या तरच त्या प्रशासन, सरकारी दरबारी पोहचतात. ‘लय भारी’ हे काम चांगल्या पद्धतीने निभावत आहे, त्यामुळेच ‘लय भारी’ला वाचकांनी डोक्यावर घेतले आहे. तुषार यांची पत्रकारिता, सामाजिक जाण पाहता ते यापुढे राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सामाजिक घडामोडी टिपून वाचकांपर्यंत पोहचवून त्यांचा विश्वास संपादन करतील, असा विश्वासही महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

No decision yet on reducing stamp duty again: Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात आणि तुषार खरात

Rasika Jadhav

Recent Posts

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला सुरुवात

शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…

15 seconds ago

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

1 hour ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

4 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

17 hours ago