38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र'विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो'

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

रसिका जाधव, टीम लय भारी

मुंबई :- कॉंग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बाळासाहेब थोरांतानी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. बाळासाहेब थोरातांच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. आभार व्यक्त करताना ते म्हणाले की, मी विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो (I see Balasaheb Thorat in place of Vilasrao Deshmukh).

बाळासाहेब थोरातांचा कौतुकास्पद निर्णय, एक वर्षाचा पगार सीएम फंडात

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

विलासराव देशमुख हे 8 वर्ष मुख्यमंत्री होते. कॉंग्रेसमध्ये विलासराव देशमुखांना आदर आहे. बाळासाहेब थोरात विलासराव देशमुखांच्या मर्जीतले होते. बाळासाहेब थोरात हे विलासराव देशमुखांच्या तालमित तयार झाले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे निष्ठांवत नेते तसेच तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बाळासाहेब थोरात हे विश्वासू नेते होते (Vilasrao Deshmukh’s Balasaheb Thorat was a loyal leader).

I see Balasaheb Thorat in place of Vilasrao Deshmukh
विलासराव देशमुख आणि बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने मतदारसंघात उभे राहीले नवे कोविड सेंटर

No decision yet on reducing stamp duty again: Balasaheb Thorat

महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना कोणीही सामान्य माणूस भेटण्यास आले तरी ते त्यांची भेट घेऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेतात. बाळासाहेब थोरातांमध्ये विलासराव देशमुखांची छबी दिसते (The image of Vilasrao Deshmukh can be seen in Balasaheb Thorat).

एका रिंगमध्येच विलासराव देशमुख फोन उचलायचे

मंत्री, आमदारांना मोबाईलवर संपर्क साधून सामान्य माणूस हैराण होवून जातो. तरीही या नेत्यांसोबत संपर्क होत नाही. परंतु विलासराव देशमुख असे नेते होते की, कुणाचाही फोन आला तरी ते लगेच उचलयाचे. मुख्यमंत्री पदावर असतानाही ते कुणाचाही आलेला फोन पटकन घ्यायचे. बैठकीत व्यस्त असले तरी ते फोन घ्यायचे. फोन करणाऱ्या व्यक्तीची व्यथा ते ऐकून घ्यायचे आणि ती समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नही करायचे.

सामान्य लोकांनाही सहज उपलब्ध असणारे बाळासाहेब थोरात

कै. विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत बाळासाहेब थोरात यांनी सामान्य माणसांशी आपली नाळ जोडलेली आहे. त्यांना मंत्रालयात किंवा बंगल्यावर भेटण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते. शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते रात्री झोपायलाही जात नाहीत. कोणीही माणूस थोरात यांना भेटायला गेला की, ते त्याला आपलेसे करतात. सामान्य लोकांशी आपुलकीने बोलणे, तळमळ व्यक्त करणे, व नियमांत बसत असल्यास त्या माणसाचे काम तातडीने मार्गी लावणे अशी थोरात यांची खाशियत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी