मुंबई

MSEDCL : मुंबईकरांना होणार 15% वीज दरवाढीची डोकेदुखी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने गुरुवारी मुंबई निवासी ग्राहकांसाठी एप्रिलपासून 15% पर्यंत वीज दरवाढ प्रस्तावित करण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी भलतीच वाढणार आहे. (MSEDCL : 15% electricity tariff hike headache for Mumbaikars)

2024-25 मध्ये टॅरिफमध्ये आणखी 15% वाढ प्रस्तावित केल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि उर्वरित महाराष्ट्रातील 2 कोटी निवासी ग्राहकांवर वीज दरवाढीचा मोठा भार पडू शकतो.

गेल्या वर्षभरात राज्यभरातील वीजचोरी प्रकरणांवर मोठी कारवाई केल्यामुळे तोट्यात घट झाली आहे. मात्र निवासी दरासाठी तुम्ही भरलेल्या ऊर्जा शुल्काचा विचार केल्यास, 1-100 युनिट्सच्या वापरासाठी प्रस्तावित वाढ 2023-24 मध्ये 4.01 रुपये प्रति युनिटवरून 4.50 रुपये प्रति युनिट इतकी आहे, जी 12% वाढ आहे. ऊर्जा वितरणमध्ये कृषी, उद्योग आणि व्यावसायिक आस्थापनांसह एकूण २.८ कोटी ग्राहक आहेत. 2019-20 मध्ये सुमारे 18% असलेल्या वितरण तोट्यात एप्रिलपर्यंत 14% पर्यंत घट करण्याचा महावितरणचा प्रस्ताव आहे.

हे सुद्धा वाचा : अदानीविरोधातील उद्रेकापुढे अखेर सरकार नमले; वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

Devendra Fadanvis : शेती पंपांच्या वीज जोडण्या कापू नका!; फडणवीसांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा

UPI Payment : इंटरनेटशिवाय UPI द्वारे वीज बिल भरू शकता! जाणून घ्या सोपी प्रक्रिया

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 101-300 युनिट्ससाठी उपभोग, 8.79 रुपये प्रति युनिटवरून 10 रुपये प्रति युनिट (14% वाढ) आणि वापरकर्त्याद्वारे 301-500 युनिट मासिक वापरासाठी, 12.42 रुपये प्रति युनिटवरून 14.20 रुपये प्रति युनिट (14%) वाढ होणार आहे. यात प्रामुख्याने 500 अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी, 15% दराने दरवाढ करण्याचा प्रस्तावित आहे. 14.21 रुपये प्रति युनिटवरून 16.3 रुपये प्रति युनिट, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Electricity Regulatory Commission (एमईआरसी)च्या प्रस्तावानुसार, एप्रिलपासून उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांना 13% दरवाढीचा सामना करावा लागू शकतो.

Team Lay Bhari

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

3 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

3 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

3 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

4 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

4 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

14 hours ago