मुंबई

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबद्दल काही आकडे थक्क करणारे !

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबद्दल (एमटीएचएल, समुद्र सेतू) काही आकडे थक्क करणारे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या मार्गावरून धावणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवला. एमटीएचएल हा एकूण 22 किमी लांबीचा मार्ग आहे. त्यापैकी तब्बल 16.5 किमी लांबीचा मार्ग हा सागरी सेतू आहे.
एमटीएचएल समुद्र सेतू पूल आता मुंबई आणि नवी मुंबईच्या बाजूने जमीनीशी जोडण्यात आला आहे. या मार्गावरुन एमटीएचएलच्या अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस सुरक्षितरित्या, यशस्वीपणे धावली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL चा शिवडी ते न्हावा मार्ग असा असेल (फोटो क्रेडिट : महाराष्ट्र शासन MTHL)
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काही थक्क करणारे आकडे –
  • शिवडी ते न्हावा 22 किमी लांबीचा 6 पदरी पूल
  • एकूण 22 किमी लांबीचा मार्ग , त्यापैकी तब्बल 16.5 किमी लांबीचा मार्ग हा सागरी सेतू.
  • दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात (MTHL) 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे 1,70,000 मे. टन स्टीलच्या सळयांचा वापर
  • मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार
  • इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार
  • जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात (MTHL) ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’साठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर
  • ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प
  • ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर
  • 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे 1,70,000 मे. टन स्टीलच्या सळयांचा वापर
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात (MTHL) ‘बुर्ज खलिफा’च्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा वापर
  • पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर
  • ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’साठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर
  • ‘बुर्ज खलिफा’च्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर

हे सुद्धा वाचा : 

मुंबई ते उरण, पनवेल, अलिबाग प्रवास होणार सुसाट; शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नोव्हेंबरपासून होणार खुला

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार: नितीन गडकरी

आणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर भोंगळी  गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक संतप्त

 

Mumbai Trans Harbor Link, Shivdi Nhava Sheva, MTHL, Amazing Facts, Facts N Figures
विक्रांत पाटील

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

12 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

14 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

16 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

16 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

17 hours ago