33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमआणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर 'भोंगळी' गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक...

आणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर ‘भोंगळी’ गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक संतप्त

‘भोंगळी केली जनता’ हे रॅप गाणे तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाले. या गण्यात गायक उमेश खाडे उर्फ शंभो याने गरिबांच्या व्यथा मांडल्या आहेत. मात्र या गाण्यात वापरलेल्या वादग्रस्त भाषेमुळे रॅपर उमेश याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे तरुण कलाकार उमेश आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीसांनी अटक केली आहे. आता गरिबांनी व्यथासुद्धा मांडायच्या नाहीत का? व्यथा व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर प्रत्येकालाच अटक करा, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान उमेश खाडे याला पोलिसांनी सोडून द्यावे अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्स करत आहेत. दरम्यान अलीकडेच 2 दिवसांपूर्वी 50 खोके एकदम ओके आणि चोर या शब्दांचा वापर करत औरंगाबादच्या एका रॅपरने शिंदे सरकारवर गटावर गाणं तयार केले. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि तद्नंतर या रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अजून किती जणांचे तोंड बंद करणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रकाश टाकत उमेशच्या सुटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर किती जणांना तुम्ही अटक करणार आहात,’ असा सवाल सरकारला केला आहे.

या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे. असे मत त्यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा : पन्नास खोके घेऊन किती चोर आले… वाल्यावर गुन्हा दाखल..!

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

केरळ ट्रेनला आग लावणाऱ्या माथेफिरुला एटीएसने केली अटक

Bhongli keli janta rapper umesh khade was arrested; citizens were angry, Bhongli keli janta, rapper umesh khade, 50 Khoke Ekdam Ok, Raj Mungose

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी