मुंबई

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

टीम लय भारी

मुंबई : मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारचा मंत्री नवाब मलिक आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे, याची लाज, शरम वाटत नाही. आणि नवाब राहिला दूर पहिले दाऊदचे बघा अशा प्रकारचे बोलण्याचे धाडस केवळ संजय राऊत करू शकतात, असा घणाघात विधान परिषदेचे (PravIn darekar) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. (PravIn darekar criticize on sanjay raut)


दाऊद जीवंत आहे की नाही हे पाहा, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दाऊद जीवंत आहे की नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार (PravIn darekar) खासदाराने करणे हे बरोबर नाही.

आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराल. पहिले त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा कारण तो दाऊदशी संबंधित आहे, हे सिद्ध झालेले आहे. म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि नको तो सल्ला देण्याचे काम संजय राऊत (PravIn darekar) करतायत. लोकांना सर्व काही समजते, असे दरेकर यांनी सांगितले.

संजय राऊत यांना दाऊद याच्याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. दाऊदला फरफटत आणण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमद्धेच आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिले आहे. ३७० कलम या देशात रद्द होऊ शकत नाही, रक्ताचे पाट वाहतील, असे बोलणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. रक्ताचा एक थेंबही या देशात सांडला नाही. त्यामुळे ती क्षमता, धमक, ताकद मोदी सरकारमद्धेच आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे (PravIn darekar) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

हे सुद्धा वाचा :-

Maharashtra govt ignoring issues of journalists, says BJP’s Pravin Darekar

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात येण्यासाठी प्रयत्न करणार :  बाळासाहेब थोरात

Jyoti Khot

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

3 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

3 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

3 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

3 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

4 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

4 hours ago