मुंबई

Raj Thackeray : … तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील, राज ठाकरेंचा इशारा

सध्या वेगवेगळ्या कारणांवरून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे चांगलेच चर्चेत आले आहेत. बऱ्याचदा ही कारणे राजकीय असली तरी ठाकरे समाजभान जपत असल्याचे सुद्धा वारंवार दिसून येते त्यामुळे त्यांची प्रत्येकच गोष्ट ही कौतुकाची, बऱ्याचदा वादाची सुद्दा ठरते. सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारे राज ठाकरे नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून राज्यातील जनतेचे, प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेत असतात. ठाकरेंची अशीच एक पोस्ट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या वाढत्या वेठबिगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुर्नवसन ह्याकडे संपुर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं असे म्हणून त्यांनी दिवसेंदिवस गडद होत जाणाऱ्या प्रश्नाकडे मुद्दामून लक्ष वेधून घेतले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियावर एका ज्वलंत विषयावर टिप्पणी करत पोस्ट केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी एक पत्रकच पोस्ट करून आपल्या भावना मांडल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत असे म्हणून ठाकरे यांनी वेठबिगारीचा मुद्दा येथे उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा…

Wine Sale : मॉल्समध्ये वाईन विक्रीसाठी भाजपची संमती आवश्यक, शिंदे गट करणार मनधरणी

ODI IND vs AUS : ‘डू ऑर डाई’ सामन्यात टीम इंडियात होणार बदल, पाहा संभाव्य प्लेइंग 11

Wipro lay off : विप्रोने एका झटक्यात 300 कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ!

पुढे राज ठाकरे लिहितात, नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यावेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं असे म्हणून ठाकरेंनी या मन विषण्ण करणाऱ्या क्रुरतेकडे लक्ष वेधले आहे.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रुर प्रथा आहे आणि तिच्या निर्मुलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच, पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असे राज ठाकरेंनी आवाहन केले आहे तसेच ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा असे सुद्धा म्हणून या प्रवृत्ती विरोधात दोन हात करण्याचे त्यांनी सुचवले आहे.

राज्यातील इतर समस्यांपैकी वेठबिगारीचा विषय सुद्धा मोठाच आहे, परंतु त्यावर कोणी आवाज उठवलाच तरी यंत्रणा त्यावर ओ दिल्यासारखं करून यावर अंमलबजावणी करणार असल्याचे केवल भासवते त्यामुळे मुळ समस्या जैसे थेच राहून जाते. यावेळी राज ठाकरेंनी या विरोधात एक पाऊल पुढे केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता तरी ‘एकदम ओक्के’ म्हणणाऱ्या शिंदे सरकारकडून काही प्रतिसाद मिळेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

3 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

3 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

4 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

5 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

6 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

7 hours ago