31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाODI IND vs AUS : 'डू ऑर डाई' सामन्यात टीम इंडियात होणार...

ODI IND vs AUS : ‘डू ऑर डाई’ सामन्यात टीम इंडियात होणार बदल, पाहा संभाव्य प्लेइंग 11

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात खेळवला जाईल.टीम इंडियासाठी आता दोन्ही सामने बाद फेरीसारखे आहेत. त्यामुळेच दुसऱ्या टी20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात.

टी20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यावेळी 3 टी20 सामन्यांच्या मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीतील आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियम येते खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 208 धावा करूनही पराभवाला सामोरे जावे लागले. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात खेळवला जाईल.टीम इंडियासाठी आता दोन्ही सामने बाद फेरीसारखे आहेत. त्यामुळेच दुसऱ्या टी20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात.

आगामी टी20 विश्वचषकापूर्वी आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन शोधण्यासाठी टीम इंडियाकडे आता फक्त 5 सामने शिल्लक आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी20 सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे बुमराह मोहाली टी20 सामन्यात खेळू शकला नाही. बुमराहच्या पुनरागमनामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याची खात्री आहे. 43 महिन्यांनंतर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरलेला उमेश फारसा प्रभाव सोडू शकला नाही. त्याने 2 षटकात 27 धावा दिल्या. त्यामुळे आता बुमराह खेळण्यासाठी पुर्णपणे फिट असल्यास त्याला उमेश यादवच्या जागी संघात निश्चितपणे स्थान दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा…

Nirmala Sitharaman : निर्मला सितारमण बारामती दौऱ्यावर आल्या

BMC Exclusive : शौचालयात कपडे धुवा, मोबाईल चार्जिंग करा आणि एटीएमने पैसेही काढा

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासली. मोहाली टी20 मध्ये अक्षर पटेल हा एकमेव गोलंदाज होता ज्याने चांगली गोलंदाजी केली. याशिवाय सर्व गोलंदाजांनी प्रति षटक 10 धावा या दराने धावा दिल्या. जसप्रीत बुमराह जितक्या लवकर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतेल, त्याचा संघ आणि त्यांना फायदा होईल. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बुमराहला टी20 विश्वचषकापूर्वी आपल्या लयीत येण्यासाठी वेळ मिळेल. लेगस्पिनर युझवेंद्र चहलने पहिल्या टी20 सामन्यात 3.2 षटकात 42 धावा दिल्या. त्यामुळे आता चहलऐवजी रविचंद्रन अश्विनला दुसऱ्या टी20मध्ये संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या T20I साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल जसप्रीत बुमराह.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी