31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्यापार-पैसाWipro lay off : विप्रोने एका झटक्यात 300 कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ!

Wipro lay off : विप्रोने एका झटक्यात 300 कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ!

भारतातील नामांकित विप्रो कंपनीने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या 300 कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या एकात्मतेसोबत दगाफटका केल्याचा दावा कंपनीचे चेअरमन रिषद प्रेमजी यांनी केला आहे. कामाचे तास संपल्यानंतर हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत काम करायचे, असा आरोपही यावेळी चेअरमन प्रेमजी यांनी केला आहे.

कंपनी आणि कर्मचारी यांच्यात व्यावसायिक संबंध सुरू होण्यापूर्वी एकात्मतेचा करार केलेला असतो. कर्मचाऱ्यांनी एकात्मतेचा करार मोडल्यास कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकण्याचे अधिकार यामध्ये कंपनीकडे राखीव असतात. याच अधिकाराचा वापर करत भारतातील नामांकित विप्रो कंपनीने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या 300 कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या एकात्मतेसोबत दगाफटका केल्याचा दावा कंपनीचे चेअरमन रिषद प्रेमजी यांनी केला आहे. कामाचे तास संपल्यानंतर हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत काम करायचे, असा आरोपही यावेळी चेअरमन प्रेमजी यांनी केला आहे.

‘कंपनीसोबत एकत्मतेने काम करू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमच्या कंपनीत थारा नाही!’ अशा आशयाचे ट्वीट प्रेमजी यांनी शेअर केले आहे. मात्र, विप्रो कंपनीने उचललेल्या या पाऊलामुळे शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये विप्रोचे शेअर्स कोसळले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

BMC Exclusive : शौचालयात कपडे धुवा, मोबाईल चार्जिंग करा आणि एटीएमने पैसेही काढा

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

Ronaldo Retirement : ‘रोनाल्डोचा फुटबॉलला रामराम!’ मोठी अपडेट आली समोर

इन्फोसिस लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड यांच्यासारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी एकाचवेळी हे कर्मचारी काम करत असल्याचे विप्रोला आढळून आले. त्यानंतर विप्रो लिमिटिड कंपनीने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केले. काढून टाकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले आहे. विप्रोशिवाय अन्फोसिस कंपनीनेदेखील आऐपल्या काही कर्मचाऱ्यांना असे वर्तन केल्यामुळे सप्टेंबर 2022च्या सुरुवातीला ईमेलद्वारे चेतावनी दिली होती. मात्र, इन्फोसिसमार्फत अद्याप असा कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, विप्रोने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा परिणा शेअर मार्केटवर झाला असल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत विप्रो कंपनीचे शेअर्स 0.35 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. शिवाय विप्रोचे शेअर आगामी काळात आणखी खाली जातील असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता आगामी काळात आयटी कंपन्यांमधील गुंतवणूक कमी होणार का?, मार्केमधील विप्रोचे शेअर्स आणखी किती कमी होणार? आणि विशेष म्हणजे विप्रोने उचललेल्या या धाडसी पावलामुळे इतर कंपन्यांच्या शेअर्सवर काय परिणाम होतो हे सगळं पाहण्यासारखं असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी