31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रWine Sale : मॉल्समध्ये वाईन विक्रीसाठी भाजपची संमती आवश्यक, शिंदे गट करणार...

Wine Sale : मॉल्समध्ये वाईन विक्रीसाठी भाजपची संमती आवश्यक, शिंदे गट करणार मनधरणी

ठाकरे सरकारच्या काळातच वाईन विक्रीबाबतचा हा अनोखा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्यावेळी भाजप विरोधी गटात बसलेला असल्याने त्यांनी चांगलाच गदारोळ घातला. राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या निर्णयावर बोचरी टीका करीत राज्यातील जनतेवर त्याचा कसा परिणाम होईल असे ओरडून ओरडून सांगत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यापैकी शाॅपिंग माॅल्स आणि किराणा दुकानांत वाईन विक्री करण्याबाबतच्या निर्णयावर चांगलाच वादंग झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपने हाच मुद्दा अनेक दिवस चघळत त्यावर प्रचंड विरोध दर्शवला होता परंतु राज्यात शिंदे सरकार आल्यापासून भाजपने थोडं सौम्य रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सरकारकडून सुद्धा वाईन विक्रीबाबतचा निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सदर निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा असे म्हणून कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी हा निर्णय घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले, त्यावेळी या निर्णय प्रक्रियेत भाजपची संमती आवश्यक असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी कबूल केले आहे.

शाॅपिंग माॅल्स आणि किराणा दुकानांत वाईन विक्रीच्या निर्णयाचा मुद्दा पुन्हा एकदा पटलावर मांडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे नाव पुढे करत या निर्णयाचा आग्रह धरणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांना भाजपचा पाठिंबा गरजेचा आहे याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे त्यामुळे विरोधी गटात सुद्धा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत. अब्दुल सत्तार म्हणाले, शंभूराज देसाई यांनी जर असा प्रस्ताव आणला तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मला कृषीमंत्री म्हणून वाटत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचेही सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे.

ठाकरे सरकारच्या काळातच वाईन विक्रीबाबतचा हा अनोखा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्यावेळी भाजप विरोधी गटात बसलेला असल्याने त्यांनी चांगलाच गदारोळ घातला. राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या निर्णयावर बोचरी टीका करीत राज्यातील जनतेवर त्याचा कसा परिणाम होईल असे ओरडून ओरडून सांगत होते, मात्र आता सत्तेत बसल्यानंतर या निर्णयाचा शिंदे गटाकडून पुन्हा निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.

हे सुद्धा वाचा…

ODI IND vs AUS : ‘डू ऑर डाई’ सामन्यात टीम इंडियात होणार बदल, पाहा संभाव्य प्लेइंग 11

Wipro lay off : विप्रोने एका झटक्यात 300 कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ!

Milk Rate Increases : सामन्यांच्या खिशाला कात्री! दूध-दह्याच्या किंमतीत पुन्हा होणार वाढ

या निर्णयात शिंदे गटातील नेत्यांना भाजपकडून पाठींबा अपेक्षित असून शेतकऱ्यांच्या नावाने या निर्णयाच्या वादाला विराम देण्याचे काम सध्या सुरू आहे. या निर्णयावर सामान्यजनांचा विचार करून त्याबाबतचा तपशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, त्यानंतर कॅबिनेट स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले होते. कॅबिनेट बैठकीत आधीच्या सरकारच्या वेळी या निर्णयाला विरोध करणारी भाजपा आता शिंदे गटासोबत उभा राहणार का असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

मंत्री शंभुराजे देसाई काय म्हणाले त्यावर बोलताना अब्दुल सत्तार पुन्हा म्हणाले, मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यासंदर्भात शंभुराज देसाई भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील आणि भाजपच्या नेत्यांना या निर्णयाबाबत ते समजून सांगतील कारण यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने सुपरमॉल्समध्ये वाईन विकण्याचा निर्णय चांगला आहे असे म्हणून सत्तारांनी त्यांची बाजू आणखी मजबूत केली आहे. या निर्णय प्रक्रियेदरम्यान विरोधी गटात बसलेल्या महाविकास आघाडीतून काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे सुद्धा आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी