मुंबई

ट्विटर अडचणीत ; एलॉन मस्क यांनी नोकरकपात केल्यानंतर ‘किड्याची’ घुसखोरी

माइक्रो ब्लॉगिंग प्लेटफार्म ट्विटरची सेवा विस्कळीत झाली असल्यामुळे कित्येक वापरकर्त्यांना ट्विटरवर पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. बुधवार रात्रीपासूनच अनेकांना ट्विटरवर पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. ट्विट केल्यानंतर काही जणांना ‘तुम्ही ट्विट करण्याची तुमची दिवसाची मर्यादा पार केली आहेत,’ असे संदेश येत आहेत. ट्विटरच नव्हे, तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करण्यातही कित्येक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Twitter in trouble; ‘Bug’ Intrusion After Elon Musk Cuts Jobs)

आम्हाला या समस्येबाबत पूर्ण माहिती असून त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “तुमच्या अपेक्षेप्रमाणे ट्विटर काम करत नसेल, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या समस्येवर आम्ही लवकरच तोडगा काढू” असे ट्विटरने म्हंटले आहे.

ट्विटरचे अब्जाधीश मालक एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मोठी नोकरकपात केली होती. परिणामी कित्येक अभियंत्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे अभियंत्यांच्या संख्येअभावी ट्विटरच्या सेवेत खंड पडत आहे. ट्विटरची सेवा सुरळीत सुरु आहे की नाही यावर देखरेख ठेवणारे संकेतस्थळ ‘डाउनडीटेक्टर‘वरही वापरकर्त्यांच्या अडचणींचा आलेख वाढत असल्याचे दिसत आहे. ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही मेटा प्लॅटफॉर्मवर ही समस्या भेडसावत आहे.

१२,००० फेसबुक वापरकर्त्यांनी पोस्ट अपलोड करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. तर इंस्टग्रामचा वापर करणाऱ्या ७,००० लोकांनी आपल्याला इंस्टाग्रामवर व्यक्त होण्यात समस्या येत असल्याचे म्हंटले आहे. ट्विटरवर २.४४ कोटी भारतीय वापरकर्ते आहेत तर ३९ कोटी ६५ लाख लोक ट्विटरवर व्यक्त होत असतात. २ कोटी ९६ लाख भारतीय फेसबुकचा वापर करतात. तर सुमारे २३ कोटी भारतीय इंस्टाग्रामवर व्यक्त होत असतात.

कोणत्या समस्या येत आहेत?
ट्विटरवर ट्विट आणि मेसेज करण्यात अडचणी येत आहेत. नवीन अकाउंट फॉलो करण्यातही समस्या उद्भवत आहेत. एलोन मस्क यांच्या ‘ट्विटर’ने सब्सक्रिप्शन (सशुल्क) सेवा सुरु केल्यानांतर या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही सेवा सुरु केल्यानंतर वापरकर्ते ४००० अक्षरांचे ट्विट पोस्ट करू शकतात.

हे सुद्धा वाचा

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

Elon Musk : मस्क पुन्हा ट्विटर खरेदी करण्याच्या विचारात! महत्त्वाची अपडेट आली समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago