मंत्रालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज, गुरुवारी, नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. (Eknath Shinde Birthday) या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर सर्वत्र धूम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने त्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहर, मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्याच्या लँडमार्क कॉम्प्लेक्समधील बंगल्यातील आकर्षक रोषणाई आणि सेलिब्रेशनच्या तयारीची खास छायाचित्रे व व्हिडिओ “लय भारी”ने रात्रीच सर्वप्रथम दाखविली होती.

आनंद दिघे-एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन वेगळ्या फ्रेम एकत्र करून व्हायरल होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी, रात्री 12 वाजता ठाण्यात बंगल्याबाहेर शिवसैनिक जमले होते. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या खासगी बंगल्याबाहेर रात्रीच जंगी सेलिब्रेशनची तयारी दिसत होती. मुख्यमंत्रीही बुधवारचे दिवसभराचे कामकाज, दौरे आणि कार्यक्रम आटोपून रात्री 12 नंतर आपल्या ठाण्यातील खासगी निवासस्थानी पोहोचले. तेव्हा सर्वप्रथम “लय भारी”नेच सारा मूड, माहौल, उत्साह आणि तयारी टिपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याने लँडमार्क कॉम्प्लेक्स ठाणे येथील CM बंगला आणि परिसर अगदी झगमगून गेला होता.

सोशल मीडियावरही एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची, 9 February ची धूम पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडिओ आणि फोटोंसह शिवसैनिक, बाळासाहेबांची शिवसेना समर्थक कार्यकर्ते भरभरून पोस्ट करत आहेत. ग्राफिक्स, आर्टवर्क याची धूम आहे.


बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना, त्यांना शाबासकीची थाप देतानाच व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ठाण्यातील प्रगतीचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तोंड भरून कौतुक केले होते. धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांचा भाषणात अतिशय अभिमानाने आणि कौतुकाने उल्लेख केला होता. शिंदे समर्थक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे कार्यकर्ते, शिवसैनिक आता 9 फेब्रुवारी रोजी, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी, जुने व्हिडिओ रिमिक्स करून सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे खास गाणेही व्हायरल होत आहे. ते असे –

बोलतो तसाच वागतो
वचनांचे मोल जाणतो
माणसातला देव हा
माणसात देव शोधतो
आसवे पुजावयास तो
धावतो हाकेस दिनरात
अनाथांचा नाथ
गरीबाची साथ
प्रगतीला हात
एकनाथ
शत्रूला मात
करतो बिनधास्त
साऱ्या मुखात
एक नाम
एकनाथ

या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून या हे कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्रभरातून ठाण्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर रात्रीपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डोंबिवलीतही आकर्षक विद्युत रोषणाई केलेली पाहावयास मिळत आहे.

युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य व सध्या अमेरिकेत असलेले नितीन लांडगे यांच्या मित्र परिवारातर्फे न्यूयॉर्क शहरांमधील टाइम स्क्वेअर व ग्रँड सेंट्रल या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसाचे बॅनर झळकावले. तिथेही हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

हे सुध्दा वाचा :

सर्वसामान्यांच्या हितासाठी बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलचे काम केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

उध्दव ठाकरे फडणवीसांशी बोलले ही सकारात्मक बाब; आता शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे

Eknath Shinde Birthday, Eknath Shinde Birthday Celebrations, 9 February CM Eknath Shinde Birthday, Eknath Shinde Birthday Celebrations In Thane, Special Birthday Song For Eknath Shinde
विक्रांत पाटील

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

2 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

3 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

3 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

4 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

4 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

14 hours ago