मुंबई

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता घरी बसून करता येणार बसचे बुकिंग

यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या हिताने विविध घोषणा केल्या. यात प्रामुख्याने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत लागू करण्यात आली. दरम्यान याची अंमलबजावणी 17 मार्च पासून सुरू झाली. या योजनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटीचे ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे आता घरी बसून एसटीच्या प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.

खरं पाहता महिलांना बसचे ऑनलाईन तिकीट बुक करताना 50 टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता. त्याचप्रमाणे महिलांना एसटी डेपो आणि अधिकृत तिकीट दलालाकडून तिकीट बुक करावे लागत होते. यामुळे महिलांची गैरसोय होत होती. याबाबत अनेक महिला प्रवाशांनी एसटी आगारात तक्रारदेखील केली होती. अखेर महिलांची ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाईन तिकीट बुकिंगमधील तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे महिलांना ऑनलाईन सुविधा प्राप्त झाली आहे.

टिकीट बुक करण्यासाठी आपण खालील लिंकवर आपला तपशील भरून 50% सवलतीची टिकीट आरक्षित करू शकता: Maharashtra State Road Transport Corporation

महिला सन्मान योजनेमुळे दररोज 18 ते 20 लाख महिला एसटीने प्रवास करत आहेत. गेल्या महिन्यात दररोजच्या महिला प्रवाशांची संख्या 9 लाखांनी वाढली आहे. व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली असल्याचे देखील एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; वाचा बेस्टचा नवा नियम

BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस

MSRTC: लालपरीचे लालडब्यात रूपांतर होण्यापूर्वी महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

Women ST Bus Half Ticket Update, MSRTS, BEST BUS, women half ticket

Team Lay Bhari

Recent Posts

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

42 mins ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

50 mins ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

1 hour ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

1 hour ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

5 hours ago

नाशिक: पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

5 hours ago