राष्ट्रीय

चंद्रशेखर बावनकुळे यांची ताकद वाढली, थेट नरेंद्र मोदी…

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदीजी यांच्याशी पहिलीच भेट होती. महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान मोदीजी यांना बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांना श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. यावेळी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती, मुलगी पायल आष्टणकर व नातू अधिराज आष्टणकर, चिरंजीव संकेत, सुन अनुष्का त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबासह कुशलक्षेम विचारणा केली. बावनकुळेंच्या लहानगा नातू अधिराज सोबतदेखील त्यांनी गप्पा देखील केल्या.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत असून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत असल्याची माहिती बावनकुळे यांनी मोदींना दिली. त्याव्यतिरिक्त, बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती सुद्धा मोदींना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, आज माननीय पंतप्रधान मोदी यांच्या भेटीने मला विलक्षण ऊर्जा मिळाली. त्या उर्जेचा उपयोग महाराष्ट्रातील 97 हजार बूथवर पक्ष मजबूत करण्यासाठी करेन. कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांच्याच सहकार्याने पक्ष बळकटीसाठी मी सतत प्रयत्न करीत राहीन, असे वचन मी मोदींना दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Mantralaya News : मंत्र्यांच्या अंधश्रद्धेपोटी १०० कोटींचा चुराडा !

आनंदाची बातमी ! गणेश दर्शनासाठी बेस्टची वातानुकूलित ‘हो हो’ बस सेवा

मंत्रालयात जनावरांचे डॉक्टर !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भेटीदरम्यान बावनकुळेंना पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचना मोदींनी त्यांना केली.

नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रतिक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे याचा आवर्जून उल्लेख बावनकुळे यांनी या भेटीत केला.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago