राष्ट्रीय

BJP : भाजपच्या ‘मिशन लोटस’ विरोधात ‘हे’ नेते उतरले रणांगणात

भाजपचे ‘मिशन लोटस’ हे अभ‍ियान सुरू आहे. मात्र भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोट बांधणीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी संपूर्ण भारत पिंजून काढण्याची मोहिम भाजपने हाती घेतली आहे. तर काँग्रेसचे नेते राहूल गांधीनी देखील विविध राज्यांमध्ये जाऊन रॅलींचे आयोजन केले आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल देखील मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहण्यासाठी तगडा चेहरा कोण याची चाचपणी सुरू आहे. त्या निम‍ित्ताने मोठे नेते एकमेंकांना भेटत आहेत. चर्चा करत आहेत.

त्यानंतर पुढची रणनिती ठरणार आहे. भाजप विरुद्ध महागठबंधन असा सामना आगामी काळात रंगण्याची शक्यात निर्माण झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ओम प्रकाश चौटाला यांची देखील भेट घेतली. त्यामुळे ही मोट बांधणी भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण नितीश कुमार हे जदयूचे नेते आहेत तर अरविंद केजरीवाल हे आपचे नेते आहेत. नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची पुर्वी पासुन मैत्री आहे.  नितीश कुमार यांच्या वर कधीही टीका केली नाही. नितीश कुमार यांनी आधी एनडीएसोबत सरकार स्थापन केले.

हे सुद्धा वाचा

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

नंतर लालूंच्या राजदसोबत गेले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली नंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. आता केजरीवाल आणखी काही राज्ये काबीज करण्याच्या तयारीमध्ये आहेत. नितीश कुमार यांनी सीताराम येंंच्युरी यांची देखील भेट घेतली. संपूर्ण देशातले डाव पक्ष एकत्र आले. खूप मोठ्या घडामोडी घडतील. काँग्रेसला आप हा एकच पर्याय आहे. काँग्रेस सोबत आम आदमी पार्टी जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

48 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

1 hour ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

2 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

3 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

5 hours ago