29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयNavneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

महाराष्ट्राच्या राजकारणातले वादग्रस्त व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातले वादग्रस्त व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. यावर औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नवीन राणांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी अत्यंत कटू शब्दात नवनीत राणांची कानउघडणी केली आहे. जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हाला हनुमान चालिसाचं महत्त्व सांगणार ? ती आम्हाला शहापण शिकवते का ? असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अमित शहांच्या दौऱ्यावरही जहरी टीका केली आहे. अमित शाह राक्षसी वृत्तीने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी तु ठाकरे है, ताे में राणा हूँ असे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेमधील उरले सुरले नेते भयंकर खवळले आहेत. ती बाई प‍िक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कपडे कसे असतात…… ती बाई… आम्हाला शहाणपणा शिकवते. तिच्या विषयी आमच्याकडे बोलू नका, तर नवनीत राणा यांनी जरा तोंड सांभाळून बोलावं, असा इशारा मुंबईतल्या शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिलाय. ही मुंबईची मुलगी त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती.

हे सुद्ध वाचा

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

तिला मातोश्रीचा, बाळासाहेब ठाकेरंचा इतिहास काय माहिती? आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवत आहे, हे महाराष्ट्राला पक्कं कळलंय… अशी जहरी टीका घाडी यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राणा दांम्पत्य आणि श‍िवसेना हा वाद चांगलाच रंगला आहे. नवनीत राणा या नेहमीच‍ शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे त्या शिवसेनेच्या निशाणार होत्या.

संजय राऊत त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटची दखल घेऊन त्यांना उत्तर देण्याचे काम करत हाेते. परंतु आता त्यांची रवानगी जेलमध्ये झाली आहे. त्यामुळे शिवसेनेवर टीका करण्याऱ्यांना उत्तर देण्याचे काम  इतर कार्यकर्त्यांना करावे लागत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी