क्रीडा

PHOTO: शेवटच्या विश्वचषकात मेस्सीने रचला इतिहास !

फिफा वर्ल्ड कप 2022: (FIFA World Cup 2022) अर्जेंटिनाचा (Argentina) 35 वर्षीय कर्णधार लिओनेल मेस्सी याने फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विजय मिळवला आहे. हा सामना जिंकत संघाने तब्बल 36 वर्षांच्या विजेतेपदाची प्रतीक्षाही संपवली आहे. तर पाहुया कसा होता हा विजयाचा क्षण…..

कतार येथे खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने विजय मिळवला आहे. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 3-3 (4-2) असा पराभव केला.

लिओनेल मेस्सीचे शेवटच्या विश्वचषकात विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेसीने तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्वकप आपल्या टिमच्या नावी केला आहे. या सामन्याच्या मैदानावर देखील सर्वत्र मेस्सी, मेस्सी, मेस्सीचे नाव गुंजत होते.

हा विश्वचषक आपला शेवटचा विश्वचषक असेल, असे लिओनेल मेस्सीने आधीच स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत विजयाचा हा क्षण अधिकच मौल्यवान ठरला होता.

मेस्सीने 2 वर्षात ही सलग दुसरी मोठी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकली आहे. मेस्सीने 2014 प्रमाणेच गोल्डन बॉलही आपल्या नावावर केला आहे.

हे सुद्धा वाचा

थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर

PHOTO: बिग बॉसमधील सलमान खानचे काही खास क्षण ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

सौदीविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव झालेला पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. परंतु मेस्सीने या विश्वचषकाच्या मोसमातील 7वा गोल करून हा विश्वचषक अर्जेंटिनाच्या नावावर करून दिला.

अर्जेंटिनाच्या संपुर्ण संघासाठी हा एक ऐतिहासिक आणि भावणिक क्षण होता. फिफा विश्वचषक जिंकण्याची आपली 36 वर्षांची प्रतीक्षा संपवत अखेर, अर्जेंटिना फिफा विश्वचषक 2022 मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला.

Roshani Vartak

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

9 mins ago

पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा किळसवाणा उद्योग

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न…

18 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत       (wealth) पाच…

25 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

44 mins ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

1 hour ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago