28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यथंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर

थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर

थंडीच्या दिवसांत सांधे दुखी, कंबर दुखी सारख्या व्याधी डोके वर काढतात, दिवसभर जीव नकोसा होतो. औषध गोळ्यांनी देखील तात्पुरता फरक पडतो मात्र त्रासामुळे जीव नकोसा होऊन जातो. तर अशा वेळी अगदी घरगुती उपाय तुम्हाला आराम देईल. तो उपाय म्हणजे डिंकाचे लाडू (Gum laddu benefit). थंडीच्या दिवसात तुमच्या शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी तसेच सर्दी, ताप, सांधे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी डिंकाचे लाडू आहारात घेतल्यास आराम मिळतो.

महिलांना देखील त्यांच्या गरोदरपणाच्या काळात डिंकाचे लाडू खाण्यासाठी दिले जातात डिंकाचे लाडू खाल्यामुळे हाडांची दुखणी कमी होतात, थकवा कमी होतो. शरीरात प्रतिकारशक्ती चांगली राहते. हिवाळ्यात देखील सांधेदुखी, हाडांची दुखणी डोके वर काढतात अशावेळी डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर ठरतात. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते, डिकांच्या लाडूमध्ये तूप, खोबरे, काजू, बदाम, मनुके असल्यामुळे शरीराला पौष्टीक आहार मिळतो.

हे सुद्धा वाचा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात २ चमचे शुद्ध देशी तूप गरम करा. यानंतर 100 ग्रॅम डिंक टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता यानंतर पॅनमध्ये काजू आणि बदाम, टाका आणि मंद आचेवर तपकीरी रंग होईपर्यंत तळा. नंतर मनुका तळून घ्या. आता यानंतर एका भांड्यात किसलेले खोबरे तळून घ्या. हे सर्व वेगवेगळे तळून वेगळ्या भांड्यात काढा. त्यानंतर डिंक थंड करा आणि हलक्या हाताने कुस्करून घ्या. त्यानंतर काजू, बदाम वगैरे बारीक करुन घ्या. त्यानंतर कढईमध्ये गव्हाचे पीठ तपकीरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या, त्यानंतर गुळामध्ये भीजलेले पीठ तसेच काजू, बदाम वगैरे टाकून घ्या आणि हलवून घ्या, त्यामध्ये डिंक, काज, बदाम, वेलची, तूप घाला अणि नंतर गॅस बंद करुन ते सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या, हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू बांधा. हे लाडू तूम्ही रोज आहारात घेऊ शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी