क्रीडा

बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले; बड्या उद्योगपतीचा हात असल्याचा आरोप

भारतीय कुस्तीगिरांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यासह इतर कुस्ती प्रशिक्षकांविरोधात बुधवारी (दि.१८) रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन (Wrestlers protest on Jantar-Mantar) सुरु केले आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने लैंगिक शोषणाबाबत (sexual abuse)केलेल्या आरोपानंतर हे आंदोलन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे बृजभूषण शरण सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर हे आरोप खरे असतील तर मी फासावर जाईन असे देखील त्यांनी म्हटले आहे. हे सर्व कटकारस्थान असून यापाठीमागे बड्या उद्योगपतीचा हात असल्याचा आरोप देखील बृजभूषण शरण सिंह यांनी केला आहे. टोकिओ ऑलंपिकमध्ये कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विश्व चॅम्पियन पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Brijbhushan Sharan Singh accused of sexual abuse; Wrestlers protest on Jantar-Mantar)

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, भारतीय कुस्ती महासंघ पैलवानांना त्रास देत आहे. जे पैलवान भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत, त्यांना कुस्तीबद्दल काहीच माहिती नाही. कुस्ती महासंघाची हुकुमशाही पैलवान सहन करणार नाहीत. तर ऑलंपिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, आम्ही भारतीय कुस्ती महासंघाचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सवाल केला की, असा कोणी खेळाडू आहे का जो सांगेल कुस्ती महासंघाने अन्याय केला? त्यांना गेल्या १० वर्षांत कुस्ती संघाबाबत कोणती तक्रार होती? ते पुढे म्हणाले, हे सगळे आरोप आता नवे नियम लागू केल्यानंतर सुरू झाले आहेत. धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या पैलवानांनी ऑलंपिकनंतर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही. लैंगिक शोषणाचा कोणता प्रकार घडलेला नाही, जर असे काही असेल तर मी फासावर जाईन.

ब्रिजभूषण पुढे म्हणाले, मला विनेश फोगटला विचारायचे आहे कीस ऑलंपिकमध्ये पराभूत झाल्यानंतर कंपनीचा लोगो असलेला पोषाख का परिधान केला नव्हता ? ती पराभूत झाल्यानंतर मी केवळ तीला प्रोत्साहन दिले होते. लैंगिक शोषण हा खुप मोठा आरोप आहे. जर मलाच यात ओढले जात असेल तर मी कशी कारवाई करु शकतो ? मी कोणत्याही चौकशीला तयार आहे.

ब्रिजभूषण म्हणाले, जेव्हा मला समजले पैलवान धरणे आंदोलनाला बसले आहेत, तेव्हा मी तातडीने विमानाने दिल्लीला आलो. कोणी आहे का असा, जो समोर येऊन म्हणेल भारतीय कुस्ती महासंघाने कोणत्याही खेळाडूचे लैंगिक शोषण केले आहे. कोणी आहे जो माझ्या समोर म्हणेल की मी लैंगिक शोषण केले आहे? हे सगळे चुकीचे आहे, यात मुख्य प्रशिक्षकाचे नाव देखील घेतलेले नाही.

बृजभूषण म्हणाले, भारतीय कुस्ती महासंघाने अनेक देशांतील नियमांचा अभ्यास केल्यानंतर नवे नियम बनविले. आम्ही ऑलंपिकनंतर ट्रायलसाठी नियम लागू केले. कुणाला ऑलंपिकमध्ये उतरायचे असेल तर त्याला देशातील अन्य खेळाडूंसोबत ट्रायल खेळण्यासाठी उतरावे लागेल. जो खेळाडू ऑलंपिकसाठी पात्र ठरला आहे त्याला देशातील ट्रायल जिंकणाऱ्या खेळाडूसोबत सामना करावा लागेल. त्यानंतर त्याची ऑलंपिकसाठी निवड होईल. जर ऑलंपिकसाठी पात्र ठरलेला खेळाडू पराभूत झाला तर त्याला आणखी एक संधी दिली जाईल. आम्ही नियमानुसार काम करत आहोत. हुकुमशाहीचा प्रश्नच येत नाही. हा माझा निर्णय नाही तर अनेक प्रशिक्षक आणि खेळाडूंची मते जाणून घेतल्यानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

आमदार कपिल पाटलांची सत्यजित तांबे यांना साथ

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये दुप्पट वेगाने काम केले : उद्योग मंत्री उदय सामंत

दरम्यान भारतीय कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी आंदोलनकर्त्या पैलवानांची भेट घेतली. ते म्हणाले, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातून माहिती झाले की काही पैलवान आंदोलनासाठी बसले आहेत. मी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आलो आहे. आतापर्यंत माझ्या किंवा कुस्ती महासंघासमोर अशा स्वरुपाचा मुद्दा कोणी उपस्थित केलेला नाही.

महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी जंतर-मंतरवर जाऊन पैलवानांची भेट घेतली. त्या म्हणाल्या भारताला एका उंचीवर घेऊन जाणाऱ्या महिला न्याय मागण्यासाठी जंतर-मंतरवर एकत्र आल्या आहेत. हे लज्जास्पद आहे. आम्ही दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय क्रीडा मंत्रालयाला नोटीस पाठविली आहे. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना अटक झाली पाहिजे आणि ज्या प्रशिक्षकांची नावे समोर आली आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

3 hours ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

4 hours ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

5 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

7 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

7 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

7 hours ago