क्रीडा

42 वर्षीय MS धोनीची चपळाई पाहून सर्व झाले थक्क, 0.6 सेकंदात 2.3 मीटरची उडी मारून झेलला चेंडू, पहा व्हिडिओ

IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपला दुसरा सामना जिंकला आहे. चेन्नई ने गुजरात टायटन्सचा (Chennai Super Kings vs Gujarat Titans) 63 धावांनी पराभव केला. या सामन्यातील महेंद्र सिंह धोनीचा (MS Dhoni) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (IPL 2024 MS Dhoni Flying Catch Viral Cricket World) धोनीने वयाच्या 42 व्या वर्षी ज्या चपळाईने कैच पकडली. त्याने जागतिक क्रिकेटला चकित केले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनीने हवेत डायव्हिंग करत विजय शंकरचा झेल घेतला, धोनीची स्टाइल पाहून फलंदाजही थक्क झाले. सोशल मीडियावर केवळ चाहतेच नाही तर माजी दिग्गजांनाही धोनीच्या शैलीचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. (IPL 2024 MS Dhoni Flying Catch Viral Cricket World)

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माला घेऊन नवज्योत सिंग सिद्धूने दिले मोठं विधान

इरफान पठाण यांनी तर माहीला आवाहन केले आहे की “आणखी एक सीझन माही..” तर सुरेश रैनाने पोस्ट शेअर केली आणि लिहिले की “टायगर अजूनही जिवंत आहे.” धोनीने 0.6 सेकंदाची प्रतिक्रिया वेळ आणि 2.3 मीटर उडी घेऊन धक्कादायक झेल घेतला, माहीच्या या झेलने चाहत्यांना वेड लावले. (IPL 2024 MS Dhoni Flying Catch Viral Cricket World)

IPL 2024चा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने T20 क्रिकेटला घेऊन दिलं मोठं विधान

विजय शंकरला डॅरिल मिशेलच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह शॉट मारायचा होता पण चेंडू बॅटच्या काठावर गेला आणि विकेटच्या मागे गेला, अशा परिस्थितीत धोनीकडे फक्त 0.6 सेकंद वेळ होता. त्यानंतर धोनीने आपले शरीर हवेत 2.3 मीटर लांब केले आणि धक्कादायक झेल घेत शंकरची विकेट घेतली. धोनीच्या या झेलने खळबळ उडाली आहे. इरफानने म्हटलं की तरूणाईत असे झेल घेतले जातात. (IPL 2024 MS Dhoni Flying Catch Viral Cricket World)

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने केला पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉल, मुलांसोबत मस्ती करतांना दिसला ‘किंग’

सामन्याबाबत बोलायचं झालं तर चेन्नई ने प्रथम फलंदाजी करत 206 केल्या ज्यात गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी 46 धावांची खेळी केली, तर शिवम दुबेने 23 चेंडूत 51 धावा करत संघाची धावसंख्या 206 धावांवर नेली.  गुजरातला 20 षटकात केवळ 143 धावा करता आल्या. हा सामना 63 धावांनी जिंकण्यात सीएसकेला यश आले. IPL 2024 मध्ये चेन्नई संघ सलग दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. पॉइंट टेबलमध्ये CSK पहिल्या क्रमांकावर आहे.

काजल चोपडे

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

4 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

6 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

8 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago