क्रीडा

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने मारली हार्दिक पांड्याला मिठी

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईच्या संघाला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आता रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवून या हंगामात आपला पहिला विजय मिळवला आहे. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya) या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा मिठी मारतांना दिसत आहे. मात्र, या फोटोनंतर सर्वांना प्रश्न पडला आहे की, मुंबईच्या ड्रेससिंग रूममध्ये सर्वे ठीक आहे की नाही. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya)

न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी PCB ने केली मोठी घोषणा

IPL 2024 च्या सुरुवाती पासूनच मुंबई इंडियन्स चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले. यामुळे चाहते खूपच नाराज झाले आहे. मात्र, सलग तीन सामने हरल्यानंतर सर्वेच हार्दिकच्या कर्णधारपदावरून प्रश्न विचारू लागले.  अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्या  खूप दडपणाखाली होता. या सगळ्या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगलेच तापले असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya)

मात्र, आता ड्रेससिंग रूममध्ये सर्व ठीक आहे की नाही. याचे लवकरच उत्तर मिळेल. कारण आता तर IPL 2024 ची सुरुवात झाली आहे. अजून भरपूर सामने बाकी आहेत. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये संघात कसलं वातावरण आहे हे पाहावं लागेल. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर हार्दिकने स्पष्टपणे सांगितले की, ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप चांगले आहे. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya)

IPL 2024: BCCI ने केले दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, पहा पूर्ण यादी

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याबद्दल बोलायचे तर, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमावून 234 धावा केल्या, पण विशेष म्हणजे या धावसंख्येमध्ये मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाचे अर्धशतक समाविष्ट नव्हते. आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने अर्धशतक न करता केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 205 धावाच करू शकला. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya)

गुजरात टायटन्सला मयंक यादवपासून राहावे लागेल सावध, गिल की राहुल, कोण जिंकणार तिसरा सामना?

रोमारियो शेफर्डला सामनावीर म्हणून निवडण्यात आले, ज्याने केवळ 10 चेंडूत नाबाद 39 धावांचे योगदान दिले. रोमॅरियो शेफर्डने तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. रोमारियो शिवाय रोहित शर्माने 49 धावांचे, इशान किशनने 42 धावांचे आणि टीम डेव्हिडने नाबाद 45 धावांचे योगदान दिले. (IPL 2024 mumbai indians first win rohit sharma hugs hardik pandya)

काजल चोपडे

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

7 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

8 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

9 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago