27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडागुजरात टायटन्सला मयंक यादवपासून राहावे लागेल सावध, गिल की राहुल, कोण जिंकणार तिसरा सामना? 

गुजरात टायटन्सला मयंक यादवपासून राहावे लागेल सावध, गिल की राहुल, कोण जिंकणार तिसरा सामना? 

IPL 2024 मध्ये 7 एप्रिल रोजी 2 सामने खेळवले जातील. या दिवसाचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्समध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे खेळवला जाईल. (IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans) शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून 2 जिंकले आहेत. तर दुसरीकडे, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत रविवारी होणाऱ्या तिसऱ्या विजयाकडे दोन्ही संघांची नजर असेल. (IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans)

IPL 2024: सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने आपले नाव घेतले मागे

या सामन्यात लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवकडे देखील सर्वांचें लक्ष राहतील. कारण तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. अशा स्थितीत गुजरातच्या फलंदाजांना त्याच्यापासून सावध राहावे लागेल. मयंकने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. तो एकटाच पूर्ण सामना बदलून देतो. अशा स्थितीत मयंकविरुद्ध गुजरातच्या फलंदाजांना सावधपणे फलंदाजी करावी लागणार आहे. लखनऊने आपल्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 28 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत केएल राहुलला कोणतेही विजयी संयोजन सोडणे आवडणार नाही. (IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans)

अभिषेक शर्माची धडाकेबाज खेळी असूनही युवराज सिंगने त्याला फटकारले, जाणून घ्या कारण

तर दुसरीकडे, गुजरात टायटन्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पंजाब किंग्जने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत गुजरात टायटन्स काही बदल करू शकतात. अष्टपैलू विजय शंकर फॉर्मशी झुंजत आहे. त्याने 4 सामन्यात 40 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 20 होती आणि स्ट्राइक रेट 105.26 होता. त्याच्या जागी शाहरुख खानला संधी मिळू शकते. याशिवाय दर्शन नळकांडे यांचा फॉर्मही काही विशेष नाही. त्याने 2 सामन्यात 1 बळी घेतला आहे. त्यांच्या जागी आर साईकिशोर यांना स्थान दिले जाऊ शकते. (IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans)

लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मयंक यादव, यश ठाकूर. (IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans)

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, केन विल्यमसन, शाहरुख खान, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, आर साई किशोर.(IPL 2024 lucknow super giants vs gujarat titans)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी