क्रीडा

IPL 2024 मध्ये सामन्यादरम्यान धूम्रपान करताना दिसला शाहरुख खान, व्हिडिओ झाला व्हायरल

IPL 2024 चा तिसरा सामना काल कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. हा सामना कोलकाता ने 4 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यानंतर केकेआरचा मालक आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान अडचणीत अडकला आहे. (IPL 2024 Shah Rukh Khan Smoking Video Viral During Kkr vs srh match) शाहरुख खान केकेआरचा पहिला सामना पाहण्यासाठी ईडन गार्डन्समध्ये पोहचला होता.

KKRकडून मिळालेल्या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्सचे मन झाले दुःखी, सामान्यनंतर म्हटलं असं काही

यावेळी तो सामन्यादरम्यान खुलेआम धूम्रपान करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) या कृतीवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अनेक यूजर्स सामन्यादरम्यानच्या शाहरुखच्या वागणुकीवरून त्याच्यावर टीका करत आहेत.

IPL 2024 साठी इरफान पठाणची ‘विशलिस्ट’, विराट आणि रोहितबद्दल म्हटलं बरंच काही

शाहरुख हा केकेआरचा (KKR)  मालक आहे. शाहरुखने (Shah Rukh Khan) सामना सुरु होण्याआधी सार्व खेळाडूंची भेट घेतली. फक्त इतकं नाही तर तो त्यांच्या ग्राउंड स्टाफला देखील भेटला. यातच त्याचा स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी शाहरुख यावेळी खरंच स्मोकिंग करत होता की नाही याचा कोणताही पुरावा नाही आहे.

MS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं ‘असं’ काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट याचे अर्धशतक, त्यानंतर आंद्रे रसेलच्या नाबाद 64 धावा, अखेरच्या षटकात हर्षित राणाच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने सुरुवात केली. केकेआरने सात गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या. तर सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 204 धावाच करता आल्या, हेनरिक क्लासेनच्या आठ षटकारांसह 63 धावांच्या अर्धशतकाने विजयाच्या जवळ पोहोचले.

17व्या षटकानंतर सनरायझर्स हैदराबादची स्कोर पाच विकेट्सवर 149 धावा होती.त्यांना विजयासाठी 18 चेंडूत 60 धावांची गरज होती, सामना त्यांच्या हाताबाहेर गेला होता, पण पुढच्या तीन षटकात क्लासेनने सहा षटकार आणि शाहबाजने दोन षटकार मारले. आणि त्याच्या संघाला विजयाच्या जवळ आणले. यामुळे 19व्या षटकानंतर 5 बाद 196 धावा झाल्या होत्या आणि विजयासाठी सहा चेंडूत 13 धावा हव्या होत्या, त्या आरामात काढता आल्या असत्या. मात्र, हैदराबादचे खेळाडू 4 धावा करू नाही शकले.

काजल चोपडे

Recent Posts

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

2 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

2 hours ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

2 hours ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

3 hours ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

3 hours ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

4 hours ago