28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाMS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं 'असं' काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा 

MS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं ‘असं’ काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा 

महेंद्र सिंह धोनीने IPL 2024 (MS Dhoni) सुरु होण्याच्या एक दिवसाआधी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.  धोनीच्या या निर्णयामुळे केवळ चाहतेच नाही तर अनेक माजी दिग्गजही आश्चर्यचकित झाले. (MS dhoni Broke Captaincy dressing room was like this revealed Stephen Fleming)

महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ने IPL 2024 सुरु होण्याच्या एक दिवसाआधी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.  धोनीच्या या निर्णयामुळे केवळ चाहतेच नाही तर अनेक माजी दिग्गजही आश्चर्यचकित झाले. (MS dhoni Broke Captaincy dressing room was like this revealed Stephen Fleming)

सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सांगितले की, आम्हाला हे आधीच माहित होते. आम्ही नवीन लीडर तयार करत आहोत. भविष्य डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेणे गरजेचे होते. याशिवाय प्रशिक्षक फ्लेमिंग यांनीही धोनीने संघातील खेळाडूंना पहिल्यांदा कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले त्या वेळेबद्दलही सांगितले.

IPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली पोस्ट

फ्लेमिंग म्हणाला, “धोनीच्या डोळ्यात अश्रू होते, सर्व काही थांबले होते…”, ड्रेसिंग रूममध्ये खूप भावना होत्या… खूप अश्रू. ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. सर्वेच भावुक झाले होते. ”
याशिवाय फ्लेमिंग पुढे म्हणाले, “भावनिक क्षणानंतर रुतुराजचे अभिनंदन करण्यात आले. धोनीचा हा भक्कम वारसा पुढे नेण्यात रूतुराज यशस्वी होईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. धोनीने ज्यावेळी पहिल्यांदा कर्णधारपद सोडला त्यावेळी आम्ही तयार नव्हतो, पण यावेळी आम्हाला या गोष्टी आधीच माहित होत्या.”

IPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

2022 मध्ये पहिल्यांदा धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र जडेजा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही, त्यानंतर हंगामाच्या मध्यावर धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले. त्याच वेळी, धोनीच्या नेतृत्वाखाली CSK 2023 साली पुन्हा चॅम्पियन बनले. माहीने CSK ला 5 वेळा IPL चे विजेतेपद मिळवून दिले आहे.

IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. CSK आणि RCB यांच्यात IPL मध्ये एकूण 31 सामने खेळले गेले ज्यामध्ये CSK ने 20 सामने जिंकले तर RCB ने 10 सामने जिंकले. तसेच, यावेळी धोनी प्रत्येक सामन्यात खेळाडू म्हणून खेळणार की नाही हेही पाहावे लागेल.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक 

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 वाजता
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 वाजता
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 वाजता
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
13. दिल्ली सुपर कॅपिटल्स वि चेन्नई किंग्स, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रिडर्स 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
17. गुजरात टायटन्स विरुद्ध  पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, 7.30 वाजता
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, 7.30 वाजता
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी