28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाIPL 2024 साठी इरफान पठाणची 'विशलिस्ट', विराट आणि रोहितबद्दल म्हटलं बरंच काही  

IPL 2024 साठी इरफान पठाणची ‘विशलिस्ट’, विराट आणि रोहितबद्दल म्हटलं बरंच काही  

आज IPL 2024चा (IPL 2024) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB IPL 2024) यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने त्याची विशलिस्ट जाहीर केली आहे. (IPL 2024 Irfan Pathan Makes 'Wishlist') इरफानने सोशल मीडियावर चाहत्यांना 5 विशलिस्ट सांगितल्या आहेत. ज्यावर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत.

आज IPL 2024चा (IPL 2024) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB IPL 2024) यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने त्याची विशलिस्ट जाहीर केली आहे. (IPL 2024 Irfan Pathan Makes ‘Wishlist’) इरफानने सोशल मीडियावर चाहत्यांना 5 विशलिस्ट सांगितल्या आहेत. ज्यावर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. इरफान पठाणने शेअर केलेल्या विश लिस्टमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठीही गोष्टी लिहिल्या आहेत. इरफान पठाणने आपल्या पोस्टमध्ये तयार केलेली इच्छा यादी खालीलप्रमाणे आहे.

MS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं ‘असं’ काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा

1. विराट कोहलीचा हा दुसरा सर्वोत्तम हंगाम असावा. वास्तविक, 2016 मध्ये कोहलीने 973 धावा केल्या होत्या, जो आयपीएलच्या एका हंगामात कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

2. रोहित शर्माचा हा सर्वोत्तम हंगाम असावा. आयपीएल 2013 मध्ये रोहितने एकूण 538 धावा केल्या होत्या जे आयपीएलमधील त्याचे सर्वोत्तम सीझन होते. यावेळी रोहित मुंबईचे कर्णधारपद भूषवणार नाही.

IPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली पोस्ट

3. रायन पराग आणि अब्दुल समद यांसारख्या खेळाडूंनी या आयपीएलमधील कामगिरीने खळबळ उडवून दिली पाहिजे. समद हा हैदराबाद संघाचा एक भाग आहे. तर पराग राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

4. कुमार कुशागरासारखे खेळाडू या हंगामात त्याच्या कामगिरीने सकारात्मक प्रभाव टाकतील. दिल्ली कॅपिटल्सने कुशाग्राला ७.२ कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

5. IPL 2024 मधील त्याच्या कामगिरीच्या आधारे, एक भारतीय गोलंदाज टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल.

IPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

IPL 2024 मध्ये झाले अनेक बदल
1. पहिल्या सामान्य आधी आरचीबी ने आपल्या  नावात बदल केले. मागच्या 16 पर्वात आरसीबी हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या नावाने उतरला होता. आता 17 व्या पर्वापासून हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या नावाने मैदानात उतरणार आहे.

2. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघानी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी च्या ऐवजी नवीन कर्णधारणची घोषणा केली. आता मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार, तर चेन्नईच्या टीमची कमान रुतुराज गायकवाड संभाळणार.

3. प्रति ओव्हरमध्ये दोन बाऊन्सरला परवानगी आणि निर्णय पुनरावलोकन प्रणाली (DRS) ची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्मार्ट रिप्ले सिस्टम लागू करण्यात आले आहे.

4. स्टॉप क्लॉक नियम आयपीएलमध्ये लागू होणार नाही, जो आयसीसीने नुकताच पांढरा चेंडू क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी लागू केला आहे. या नियमानुसार गोलंदाजांना पुढील षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांचा अवधी मिळेल, त्यासाठी दोन इशारे देण्यात येतील. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी