क्रीडा

कौतुकास्पद : वानखेडेत होणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा..!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला कौतुक आहे. सचिनच्या येत्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. 2023 च्या आयसीसी विश्वचषकावेळी या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी आज (दि. 28) एमसीएमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली. (Sachin Tendulkar’s Statue will be built in the Wankhede Stadium)

आयकॉनिक स्टेडियममध्ये एखाद्या खेळाडूचा पुतळा बसवण्याची ही पहिलीच घटना आहे. हा पुतळा एमसीए लाउंजच्या बाहेर वर्तुळाकार प्लॅटफॉर्मवर उभारला जाईल. सचिन तेंडुलकर आपल्या वयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना हा पुतळा महत्त्वाचा ठरणार आहे. 2023मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल. कारण यावेळी क्रिकेट विश्वातील बरेच दिग्गज उपस्थित असतील. हा एक भव्य सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे काळे यांनी सांगितले.

हा एक सुखद धक्का आहे: सचिन तेंडुलकर
याबाबत सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘पुतळा उभा करण्याचा निर्णय माझ्यासाठी सुखद आश्चर्य आहे. १९९८ मध्ये वानखेडेवरून मी माझ्या क्रिकेटचा प्रवास सुरू केला. मी पहिला रणजी सामना येथे खेळलो. आचरेकर सरांनी मला येथे क्रिकेटचे धडे दिले. तेव्हापासून मी एक गंभीर क्रिकेटपटू बनलो. मी माझा शेवटचा सामना याच ठिकाणी खेळलो आहे.

photo credit -google : Sachin Tendulkar

पुढे तो म्हणतो, या ठिकाणाच्या काही आठवणी माझ्यासाठी अद्भुत, काही संस्मरणीय आणि काही कटू आहेत. मी येथे राहून खेळण्याचा आनंद लुटला आहे. माझ्यासाठी ही खास जागा आहे. पुतळ्याबाबत ‘एमसीए’ कडून मला सांगण्यात आले. तेव्हा मला सुखद धक्का बसला. यासारख्या गोष्टी दुर्मिळ आणि अद्वितीय आहे, माझ्यासाठी हा विशेष प्रसंग आहे. येथे कोणत्या प्रकारचा पुतळा तयार केला जाईल, यावर मी एमसीएसोबत चर्चा केली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

कूल कॅप्टनला लागले शेतीचे वेड; एमएस धोनीचा हा अवतार पाहिलात का?

क्रिकेटपटू केदार जाधवचे वागणे खेळाला लाथा मारण्यासारखे; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

सचिन तेंडुलकर भारतासाठी 200 कसोटी 463 एकदिवसीय आणि T20I सामना खेळला आहे. क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमध्ये त्याने एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 100 शतकांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आहे. 2011 मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला विश्वचषकावर मोहर उमटवली होती.

Team Lay Bhari

Recent Posts

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

43 mins ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

55 mins ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

1 hour ago

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…

2 hours ago

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…

2 hours ago

कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा प्रोमो रिलीझ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…

2 hours ago