मनोरंजन

कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा टिझर रिलीझ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय. या नवीन बदलाची सुरूवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली . कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतच असते. नुकतेच ‘सुख कळले’ ही नवी मालिका आपल्या रसिकजनांना भेटायला आली. ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झालीय. ‘अबीर गुलाल’ (Abir Gulaal) ,असे या नव्या मालिकेचे नाव असून नुकताच या मालिकेचा टिझर रिलीझ करण्यात आला आहे.(A new series is coming to Colors Marathi; ‘Abir Gulaal’ teaser out)

नियतीचे चक्र हे प्रत्येकाच्या नशिबात असतेच. हे चक्र कोणापासून अडलेले नाही. कधी कधी नियती असे डाव आपल्यासमोर टाकते की , त्या डावातून बाहेर पडणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. अशीच एक गोष्ट आपण या नव्या मालिकेत पाहणार आहोत. दोन अनोळखी मुलीची नशीबे एका रात्रीत बदलली. काय आहे या मुलींच्या नशिबात ? जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘अबीर गुलाल’. या मालिकेचा टिझर तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.

अबीर गुलाल या मालिकेत आता कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचप्रमाणे ही गोष्ट नेमकी काय असणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागली आहे. मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहत राहा कलर्स मराठी.

टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

54 mins ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

1 hour ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

3 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

6 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

6 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

7 hours ago