29 C
Mumbai
Wednesday, March 15, 2023
घरक्रिकेटक्रिकेटपटू केदार जाधवचे वागणे खेळाला लाथा मारण्यासारखे; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

क्रिकेटपटू केदार जाधवचे वागणे खेळाला लाथा मारण्यासारखे; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

क्रिकेटपटू केदार जाधव (cricketer Kedar Jadhav) याच्यावर शिस्तभंग कारवाई (disciplinary action) करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्या दरम्यान केदार याने कौटुंबिक कारण देत सामना मध्येच सोडून तो निघून गेला होता. मात्र त्यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत एका बैठकीत दिसला. हा शिस्तभंग असून त्याच्यावर कारवाईची मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. केदारचे हे वागणे म्हणजे ‘क्रिेकेटच्या भरवश्यावर मोठे होणे आणि त्याच खेळाला लाथा मारण्यासारखे’ असल्याचे देखील पाटील म्हणाले. (cricketer Kedar Jadhav against Demand for disciplinary action)

सामना अर्धवट टाकून गेल्याबद्दल केदार जाधव बीसीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले. खेळाडू कितीही मोठा असला तरी सामना समितीच्या नियमानुसार तसेच खिलाडूवृत्तीने वागले पाहिजे. अन्यथा क्रिकेट सोडून घरी बसले पाहिजे, असा सूचक सल्ला देखील पाटील यांनी जाधवला दिला आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये केदार महाराष्ट्राचा टीम मध्ये आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध तामीळनाडू असा रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला होता. पंरतु, या सामन्यादरम्यान केदार कौटुंबिक कारण देत सामना अर्धवट सोडून निघनू गेला होता. पंरतु, यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसला. रोहित पवार यांनी बोलावलेल्या एमसीएच्या बैठतीत केदारने हजेरी लावली होती. हा शिस्तभंग असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

हे सुद्धा वाचा

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे’ काम पाहा …

एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार फोन करतात, मार्गदर्शन करतात, मी त्यांचा आभारी आहे

Google च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

उन्मात करून पैशांच्या जारोवर काहीही करणे योग्य नाही. आतापर्यंत केदार यांनी अनेक चुका केल्या आता, त्यांच्या चुकांना माफ केले जाणार नाही, असा इशारा हेमंत पाटील यांनी दिला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी