क्रीडा

T20 World Cup 2024 मध्ये रोहित शर्मासोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, ब्रायन लाराने दिला सल्ला

IPL 2024 सुरुवात झाली आई. यातच आता भारतीय संघाने ICC T20 World Cup 2024 ची तयारीही तीव्र केली आहे. बीसीसीआय कधीही भारतीय संघाची घोषणा करू शकते. आयपीएलमध्ये जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यानुसार त्या खेळाडूचा संघाच्या संघात समावेश केला जाईल. (T20 World Cup 2024 brian lara say virat kohli opening with rohit sharma) टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याला भारतीय संघातून वगळले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय रोहित शर्मासोबत सलामीला कोण मैदानात उतरणार याचीही चर्चा आहे. याच दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याने भारतीय संघाला सल्ला दिला आहे. (T20 World Cup 2024 brian lara say virat kohli opening with rohit sharma)

IPL 2024: RCBच्या ‘या’ स्टार खेळाडूने केली घोषणा, म्हणाला- ‘हे माझे शेवटचे आयपीएल आहे’

भारताचा महान फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. किंग कोहली आयपीएल 2024 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या हंगामात आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये कोहलीने एक शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. असे असूनही विराट कोहलीला टी-20 विश्वचषक संघात आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण दरम्यान, ब्रायन लाराने दिलेल्या सल्ल्याने आकृती थोडी अधिक स्पष्ट होईल असे वाटते. (T20 World Cup 2024 brian lara say virat kohli opening with rohit sharma)

रोहित शर्माला दिली जस्टिन लँगर यांनी खुली ऑफर, म्हणाले- कधी पण LSG मध्ये येऊ शकतो

भारतीय संघाकडे रोहित शर्मासह सलामीसाठी अनेक फलंदाज आहेत. या यादीत इशान किशन, संजू सॅमसन, केएल राहुल, शुभमन गिल व्यतिरिक्त विराट कोहली देखील आहे. विराट कोहली भारतीय संघासाठी सलामी देत नाही, तो फक्त आयपीएलमध्ये सलामीवीर फलंदाजीसाठी येतो. असे असूनही, ब्रायन लारा म्हणाला की, टी-20 विश्वचषकात रोहित शर्मासोबत फक्त विराट कोहली सलामीला यायला हवे. (T20 World Cup 2024 brian lara say virat kohli opening with rohit sharma)

IPL 2024: पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम काय घडलं? पहा व्हिडिओ

वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूने स्टार स्पोर्ट्सवर हे वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले आहे. एकीकडे विराट कोहलीबद्दल चर्चा आहे की, त्याला भारतीय संघातून वगळले जाऊ शकते, याच दरम्यान ब्रायन लाराने कोहलीला संघात ठेवण्याबाबत बोललेच नाही तर त्याला सलामीचा सल्लाही दिला आहे. लारा पुढे म्हणाला की, विराट कोहली ऐवजी शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे. आता विराट कोहलीवर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहायचे आहे. किंग कोहलीला भारतीय संघात स्थान मिळेल की नाही. (T20 World Cup 2024 brian lara say virat kohli opening with rohit sharma)

काजल चोपडे

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

51 seconds ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

23 mins ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

34 mins ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

50 mins ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

1 hour ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

14 hours ago