क्रीडा

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने केला पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉल, मुलांसोबत मस्ती करतांना दिसला ‘किंग’

IPL 2024 च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जमध्ये (RCB vs PBKS) रोमांचक सामना खेळण्यात आला. या सामन्यात विराट कोहली ने धडाकेबाज फलंदाजी करत आपल्या टीमला विजयी मिळवून दिला. कोहलीने 49 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. (Virat Kohli made a video call to his wife Anushka) सामनाच्या दरम्यान विराट कोहली ने सलामीवीर म्हणून आपली भूमिका पूर्ण केली. तसेच, सामना संपल्यानंतर कोहलीने वडील म्हणून कर्तव्य पार पाडले आणि मैदानातून व्हिडिओ कॉलवर कुटुंबीयांशी बोलले.(Virat Kohli made a video call to his wife Anushka)

विराट कोहलीच्या नावांवर नोंदवला गेला ‘हा’ खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे दिसत आहे. विराट कोहली आपला पहिला सामना जिंकल्याचा आंनद आपल्या कुटुंबासोबत साजरा करतांना दिसत आहे. (Virat Kohli made a video call to his wife Anushka)

यादरम्यान, मुलांना हसवण्यासाठी विराट कोहलीने चेहऱ्यावर विविध प्रकारचे हावभाव व्यक्त केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. कोहलीच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने ४ चेंडू बाकी असताना पंजाबचा चार विकेट्स राखून पराभव केला. (Virat Kohli made a video call to his wife Anushka)

ठरलं मग! यादिवशी खेळला जाणार IPL 2024 चा अंतिम सामना, पहा कुठल्या मैदानावर रंगणार

चेन्नईच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने (RCB vs PBKS) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 19.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.

विराट कोहलीने ब्रेक दरम्यान आपला वेळ कसा घालवला याबद्दल ब्रॉडकास्टर हर्षा भोगले यांच्याशी बोलले. कोहली म्हणाला की, अनेक महिन्यांनंतर त्याने सामान्य जीवन जगले. भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की तो रस्त्यावर चालत असताना त्याला खूप आराम वाटला आणि कोणीही त्याला ओळखले नाही आणि सेल्फी आणि ऑटोग्राफची मागणी नाही.

IPL 2024: हार्दिकने रोहित शर्मासोबत केलं असं काही, ज्याला पाहून चाहते संतापले, पहा व्हिडिओ

विराट कोहलीसाठी सध्याचे आयपीएल हे आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या ऑडिशनसारखे आहे. पंजाबच्या गोलंदाजांना उद्ध्वस्त करत 77 धावांची तुफानी खेळी खेळताना कोहली कसोटीत उत्तीर्ण होताना दिसला. कोहली हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असून त्याचा फॉर्म कायम राखून भविष्यात भारताला टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

काजल चोपडे

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

4 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

4 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

4 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

5 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

5 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

8 hours ago