IPL 2024 ची सुरुवात झाली. IPL 17 चे आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने आपले पहिले सामने जिंकून धडाकेबाज सुरुवात केली आहे. (IPL 2024 Final date decided, the match will be played at this ground) भारतीय क्रिकेट बोर्डने (BCCI) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये 21 सामने खेळवले जाणार आहेत.
तसेच, बीसीसीआई लवकरच दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करणार आहे. यादरम्यान, आयपीएल 2024 वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2024 च्या फायनल सामन्याची तारीख समोर आली आहे. (IPL 2024 Final date decided, the match will be played at this ground)
IPL 2024: हार्दिकने रोहित शर्मासोबत केलं असं काही, ज्याला पाहून चाहते संतापले, पहा व्हिडिओ
मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर (M. A. Chidambaram Stadium) खेळवला जाणार आहे. तसेच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरचे सामने आयोजित केले जातील. तर क्वालिफायरचा दुसरा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर रंगणार आहे.
तुम्हाला सांगते की, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्याटीममध्ये एलिमिनेटरचा सामनाखेळला जाईल. क्वालिफायर-1 मध्ये हरणारी टीम आणि एलिमिनेटर मधील विजेती टीमचा क्वालिफाय-2 सामना होईल. यातील क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेती टीम आयपीएलचा अंतिम सामना खेळतील.
IPL 2024: गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिलं मोठं विधान
बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गतवर्षीच्या गतविजेत्या (चेन्नई सुपर किंग्ज) च्या घरच्या मैदानावर सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा पाळली आहे.’ मागील आयपीएल हंगामात, सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला कारण गुजरात टायटन्स आयपीएल 2022 हंगामात चॅम्पियन बनला होता.
IPL 2024 मध्ये सामन्यादरम्यान धूम्रपान करताना दिसला शाहरुख खान, व्हिडिओ झाला व्हायरल
IPL प्लेऑफ सामन्यांची संभाव्य ठिकाणे
- अंतिम सामना (२६ मे ): MA चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- क्वालिफायर 1: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- एलिमिनेटर: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- क्वालिफायर 2: MA चिदंबरम स्टेडियम, चेन्नई