राजकीय

राज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ?, आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (29 नोव्हेंबर) शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने वेदांता फॉक्सकॉन आणि इतर महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत राज्य सरकारला आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात बसलेल्या खोके सरकार कधी तरी महाराष्ट्रासाठी काम करेल का? असा सवाल उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

Video : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी !

ऋतुराजने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात धरली होती, 7 षटकारांनंतर आई-वडिलांचे कौतुकोद्गार

एक दिवस आजी-आजोबांसाठी

आम्ही आंदोलन करतो तेव्हा शेमडी पोरं म्हणतात. त्यांच्याविरोधात बोललं लिहिलं की, पत्रकारांनाही वाट्टेल ते बोललं जातं. अजून शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानभरपाई पोहचण्याचा प्रश्नच नाही. यामचे नेते पोलीस स्टेशनच्या आवारात गोळ्या झाडतात. पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले आहे की, वेदांता फॉक्सकॉन आज गुजरातमध्ये गेला आहे. तो गुजरातमध्ये गेला याचं वाईट वाटत नाही. मात्र इथला लोखो लोकांचा रोजगार गेला. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. या मुद्यावर आमचा दावा खोटा आहे, असा आरोप झाला. तो महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेला असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ज्याला दीड महिन्यांनी उत्तर आलं आहे. त्याचा पुरावाच मी आणला आहे, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, हे पत्र आल्याचं मी सांगत होतो. पण ते माझ्या हातात नव्हतं. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला हे सांगितलं होतं. उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री खोटं बोलतायत का? घटनाबाह्य मुख्यमंत्री तर यावर बोलतच नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी यावर चर्चा करावी. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडनंच मला यावर उत्तर हवं आहे. ते म्हणाले, काल आमच्या सरकारला तीन वर्ष झाली असती. या काळात आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणलेत. मात्र आज त्याचं श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

11 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

11 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

11 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

12 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

13 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

14 hours ago