28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईएक दिवस आजी-आजोबांसाठी

एक दिवस आजी-आजोबांसाठी

आई- वडिलांपेक्षाही लहान मुलांना अतिशय जवळचे वाटणारे आजी- आजोबा यांचा कृतज्ञता दिन त्यांचा सन्मान म्हणून महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत आजी-आजोबा कृतज्ञता दिनाचे आयोजन धारावीच्या पी.एम.जी.पी. कॉलनी येथील मनोहर जोशी महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.

आजकालच्या जगात आपल्या आणि कुटुंबियांच्या गरजा भागवण्यासाठी पालकांना दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत आई-वडिलांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला आणि मुलांचे चांगले संगोपन करण्यास असमर्थ असतात. अशा स्थितीत मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडिलांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई- वडिलांपेक्षाही लहान मुलांना अतिशय जवळचे वाटणारे आजी- आजोबा यांचा कृतज्ञता दिन त्यांचा सन्मान म्हणून महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत आजी-आजोबा कृतज्ञता दिनाचे आयोजन धारावीच्या पी.एम.जी.पी. कॉलनी येथील मनोहर जोशी महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमातून आजी-आजोबा यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व, आजी-आजोबांचे अनुभव, आजीबाईचा बटवा तसेच त्यांच्याप्रति नातवंडांची जबाबदारी, गाणी, गोष्टी, खेळ व अल्पोपहार अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबूराव माने उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांसह आजी-आजोबांनाही विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता; रुग्णांना एअर लिफ्ट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड!

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

‘गोमूत्र पवित्र, पण दलित अपवित्र…’

आजच्या जिवनात एकमेकांमधील नाते टिकून रहावं. आजी-आजोबांचे महत्त्व आजच्या नातवंडांपर्यंत पोहचावं. आजी- आजोबा आणि नातवंडांमधील ऋनानुबंध घट्ट व्हावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेत येणाऱ्या नातवंडांच्या वतीने त्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार करण्याचे नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे आई- वडिल आणि आजी-आजोबा यांच्या वतीन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत यावेळी माजी आमदार बाबूराव माने यांनी ‘लय भारी’शी साधलेल्या विशेष संवादा दरम्यान व्यक्त केले.

दरम्यान, आयोजित करण्यात येणारा आजी- आजोबा यांचा कृतज्ञता दिन हा उपक्रम आजच्या समाजात एक वेगळी उमेद निर्माण करणारा ठरू शकेल. शिवाय या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांना आपल्या पालकांचा आदर करण्याची शिकवण मिळू शकेल ज्यामुळे मुलांवर आपसुकच चांगले संस्कार घडतील आणि उज्वल पिढीच्या निर्मितीसाठी मदत होील अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय आजी-आजोबा आणि नातवंडांमधील नाते हे अतुट प्रेमाचे नाते असते. अशा स्थितीत आजी आजोबांना आपल्या नातवंडांकडून कोमत्याही गोष्टीची अपेक्षा नसते तरीही अशा उपक्रमांमधून मनस्वी आनंद मिळत असतो आणि आजी आजोबांचे महत्त्व समाजात पोहोचण्यासाठी मदत होत असल्याचे मत आजी-आजोबांकडून व्यक्त करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी