राजकीय

Aditya Thackeray : ‘…ते गद्दार म्हणूनच राहणार’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद अजूनही शमलेला नाही. कोणत्या ना कोणत्या कारणांवरून एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात व्यस्थ असणारे हे नेते नेहमीच माध्यमांचे लक्ष वेधून घेत असतात. यावेळी सुद्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना लक्ष करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना आमच्या पाठीत जो खंजीर खुपसला तोच खंजीर जनतेच्या पाठीत खुपसत आहेत. ह्यांच्या खुर्च्या चिकटलेल्या आहेत, सोडायला तयार नाहीत. सगळे गद्दार आहेत, ते गद्दार म्हणूनच राहणार आहे असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांनी फटकारले आहे.

आदित्य ठाकरे सध्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत दौऱ्याचे अपडेट त्यांनी लिहिले आहेत. ट्विटमध्ये आदित्य ठाकरे लिहितात, शेतकरी बांधवांच्या भेटीसाठी आज अकोल्यात दाखल झालो आणि दाखल झाल्या झाल्या जनतेच्या प्रचंड प्रेमाने भारावून गेलो. जनतेचे प्रश्न समजून घ्यायला आणि शेतकऱ्यांचा आवाज असंविधानिक सरकारपर्यंत पोहोचवायला मी सज्ज आहे असे म्हणून त्यांनी अकोलकरांचे कौतुक केले आहे.

या भेटीदरम्यान जिल्ह्यातील बाळापुर शहरात आयोजित सभा आदित्य ठाकरे यांनी चांगलीच दणाणून सोडली. यावेळी शिंदे गटातील नेत्यांना धारेवर धरताना विशेषतः मंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) वयक्तिक टीकेली सुद्धा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला पप्पू म्हणताय. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत’ असं ओपन चॅलेंजच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी हो आहे मी पप्पू असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा…

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा ‘पेनड्राईव्ह’ची एन्ट्री!

Abdul Sattar : ‘ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे’; मेहबुब शेख यांचा सत्तारांना इशारा, घरासमोर आंदोलन

Abdul Sattar Apology : ‘मी माफी मागेल पण…’ सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेवर अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण

पुढे आदित्य ठाकरे म्हणतात, आमच्या पाठीत जो खंजीर खुपसला तोच खंजीर जनतेच्या पाठीत खुपसत आहेत. यांच्या खुर्च्या चिकटलेल्या आहेत, सोडायला तयार नाहीत. सगळे गद्दार आहेत, ते गद्दार म्हणूनच राहणार आहे. कृषिमंत्री, उद्योग मंत्र्यांसह 40 आमदार हे गद्दार आहे. मी असेल छोटा पप्पू, पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिक राहा. आपल्या राज्यात खूप झाले बंटी बबली झाले आहे, असे म्हणत शिंदे गटातील नेत्यांना त्यांच्याच भाषेत ठाकरेंनी पलटवार केला आहे.

पन्नास खोके घेणाऱ्या 40 आमदारांना राज्यात तोंड दाखवने मुश्किल झाले आहे. लग्नात गेल्यावर नातेवाईक व नागरिक विचारणा करीत असल्याने गद्दारांची मोठी अडचण झाली आहे. अतिवृष्टि झाल्यावरही शेतकरी बांधवांना आर्थिक मदत नाही. जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणून त्यांनी सत्तेत बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना मिश्किल शब्दांत टोलेबाजी केली आहे.

दरम्यान, या आधी सुद्धा राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते, याच पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू करत खिल्ली उडवली होती. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे म्हणून आदित्य ठाकरेंच्या बोलण्यावर टीकास्त्र सोडले होते.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे #rss चे एजंट I

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

1 min ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

11 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

41 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago