29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रAbdul Sattar : 'ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे'; मेहबुब शेख...

Abdul Sattar : ‘ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे’; मेहबुब शेख यांचा सत्तारांना इशारा, घरासमोर आंदोलन

‘ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे’; मेहबुब शेख य़ांचा सत्तारांना इशारा, घरासमोर आंदोलन
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांचा निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तारांच्या घराबाहेर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस फौजपाठा देखील तेथे होता. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतले. मेहबुब शेख यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” आदरणीय युप्रिया ताई सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तारच्या घरासमोर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारे गलिच्छ वक्तव्य हे ही एखाद्या महिलेबाबत करते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरवापर आहे. ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे. अब्दुल सत्तारचा माज राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी उतरविल्या शिवाय शांत बसणार नाही.

काय म्हणाले कृषी मंत्री अब्दुल सत्तार ?

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांच्याशी वृत्तवाहिन्यांनी संवाद साधत असताना त्यांना 50 खोक्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले ”इतकी भिकार*** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिला ही देऊ” असे विधान केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी