राजकीय

Amit Shah : अमित शाह मुंबईत आले, अन् बारामतीची रणणीती आखली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महापालिका मंत्रीपदे, 12 आमदारांची नावे आणि मुंबई महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुका याकडे शाह यांनी लक्ष दिले आहे. पण या दौऱ्यात त्यांनी बारामतीची सुद्धा ‘विशेष काळजी’ घेतल्याचे दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रिंगणात उतरविले जाणार आहे. त्या अनुषंगाने स्वतः सितारमण या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीला रवाना करण्यात आले आहे.
अमित शाह यांच्या सुचनेनुसारच बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांचा या महिन्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा जोरदार कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

Governor : ‘ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी रद्द करणे ही संवैधानिक चूक’

Ahmednagar News : हिंदू देवतांची विटंबना करून पुजाऱ्याला केली मारहाण

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

मंगळवारी संपूर्ण एक दिवस ते बारामती लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांतून संवाद साधून भाजपा संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामुळे बारामती मतदार संघात राजकीय रंग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या संपुर्ण घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाला कमालीचा वेग आला असून अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी बारामतीची रणणीतीच आखली का असा सवालच आता उपस्थित होत आहे. निर्मला सीतारमण यांना बारामती देण्यात आल्याने सुप्रिया सुळे यांची आव्हाने वाढणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कसा असेल चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यक्रम?

सोमवारी रात्री 11.30 वा. प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती येथे पोहचतील व मुक्कामी असतील. मंगळवारी सकाळी 08.30 वा. कन्हेरी मंदिरला भेट देतील. सकाळी 09.15 वा. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधतील. सकाळी 10.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रैलीत सहभागी होतील. सकाळी 11.00 वा. कसबा येथील युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन करतील.

त्यानंतर सकाळी 11.20 वा. भाजपा कार्यालयास भेट देतील. दुपारी 12.30 वा. मुक्ताई लॉन भिवगन रोड येथे भाजपा जिल्हा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी 01.30 ते 02.00 राखीव. दुपारी 02.30 वा. मुक्ताई लॉन येथेच लोकसभा कोअर टीमची व दुपारी 03.30 वा. सोशल मीडिया बैठक घेतील. सायंकाळी 05.30 वा. माळेगाव येथे बुथ बैठक घेतील. सायंकाळी 06.30 वा. मारेगाव गणपती मंदिरात दर्शन घेतील. सायंकाळी 07.00 वा. पुणेकडे प्रस्थान करतील. रात्री 08.00 वा. सरतोपवाडी येथील गणेश फेस्टीवलला भेट देतील.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

12 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

12 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…

13 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

14 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस…

15 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

16 hours ago