30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयHemant Soren : 'अखेर' हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

झारखंडमध्ये दीर्घकाळ सुरू असलेली राजकीय लढाई अखेर हेमंत सोरेन यांनी जिंकली आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्या सरकारने 48 मतांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे.

झारखंडमध्ये दीर्घकाळ सुरू असलेली राजकीय लढाई अखेर हेमंत सोरेन यांनी जिंकली आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्या सरकारने 48 मतांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. विश्वास ठराव जिंकल्यानंतर भाजपने सभात्याग केला. तर काँग्रेसचे तीन आमदार विधानसभेत पोहोचले नाहीत. हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी हा पदभार‍ स्विकारला. ते भारतातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन यांनी आजा विधासभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. विश्वास दर्शक ठरावा पूर्वी हेमंत सोरेन हे युपीएच्या आमदारांसोबत विधानसभेत पोहोचले. त्यानंतर मतदान झाले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता बाबूलाल मरांडी  विश्वास दर्शक ठरावासाठी विशेष सत्र बोलावल्यानंतर हेमंत सोरेन यांचा राजीनामा मागणार होते. हेमंत सोरेन यांनी प्रस्ताव जिंकण्यापूर्वी भाजपवर आरोप केले की, भाजप जिंकण्यासाठी वाद निर्माण करत आहे. गैर भाजप सरकार असणाऱ्या राज्यात भाजप सरकार पाडण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. त्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करत आहे. आमदारांना गाठून करोडो रुपयांचे आमिष दाखवले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Rahul Gandhi : ‘त्या’ एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

झारखंडमध्ये युपीएची सत्ता आहे. परंतु अविश्वास दर्शक ठराव मांडून सरकार पाडण्याच्या तयारीत होता.‍ त्यामुळे सोरेन हे 30 आमदारांना घेऊन रायपुरमध्ये गेले होते. 30 ऑगस्टपासून ते रायपुरमध्ये होते. हेमंत सारेन यांना 49 आमदारांचे समर्थ आहे. 81 सदस्यांचे बहुमत आहे. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 30 तर काँग्रेसचे 18 आणि राजदच्या एका आमदारचा समावेश आहे. भाजपकडे केवळ 26 आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सरकार फोडण्याची अभियान सुरू आहे.

Hemant Soren : 'अखेर' हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

गैर भाजप सरकार फोडण्यासाठी भाजप करोडो रुपयांचा वापर करत आहे. महाराष्ट्रात 50 खोके देऊन सरकार फोडल्याचा आरोप भाजपवर आहे. तसेच‍ दिल्लीमधील आपचे सरकार फोडयासाठी देखील भाजपने 20 खोक्यांची ऑफर दिल्याचे बोलले जाते. तोच प्रयोग त्यांनी झारखंडमध्ये देखील केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हेमंत सोरेन यांनी आपले आमदार सुरक्ष‍ित ठिकाणी देऊन हे आरिष्ट टाळले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी