राजकीय

RTO च्या अधिकाऱ्यांची बोगसगिरी, अनिल गोटेंनी उठवला आवाज !

सर्वाच्च न्यायालय केंद्र व राज्य शासनाने रदद केलेल्या BS4 डिझेल इंजिनच्या 200 पेक्षा जास्त गाडयाची शंभर कोटी रूपयांची अफरा तफर करून नंदुरबार परिवहन कार्यालयात नोंदणी प्रचंड खळबळ झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. याप्रकरणात सखोल चोकशी करण्यात यावी आणि प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं अशी देखील मागणी अनिल गोटे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडून करण्यात यावा असं देखील अनिल गोटे यांनी नमुद केले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत एक पत्र लिहित ही मागणी केली आहे.

सर्वाच्च न्यायालयाने एका प्रकारणाचा निकाल देत असतांना BS4 हे इंजिन रदद केले आहे. परंतु काही लोकांकडे बिना नोंदणी झालेल्या 854 इंजिनच्या अनेक गाडया पडून होत्या. त्यांनी सर्वाच्च न्यायालयाला विनंती करून वेळोवेळी मुदत वाढवून घेतली. सर्वोच्च न्यायालयाने परिवहन मंत्रालयाला एका आदेशान्वये स्वच्छ शब्दात आदेश दिला आहेत. की 1 एप्रिल 20222 पासून BS4 च्या इंजिनाच्या वाहनांची नोंदणी केलीतर न्यायालयाच्या अवमान समजण्यात येईल. या कारणामुळे व न्यायलयाच्या सक्त आदेशामुळे BS4 इंजिनाच्या ट्रक, कार, जिप, ट्रक्टर इत्यादी सर्व वाहनाची नोंदणी (रजिस्ट्रेशन) RTO कार्यालयातून बंद आहे. न्यायलयाच्या या आदेशामुळे वाहन निर्मीती कारखान्याचे शेकडो कोटी रूपयाचे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा

बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

लहानपणी वर्णद्वेष सहन करावा लागला होता, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा खुलासा

राज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !

हा कायदा देशभरातील सर्व वाहन नोंदणी कार्यालयांना सारखाच लागू आहे. असे असतांना नंदुरबार येथील कार्यालयाने वाहन नोंदणी कार्यालयाने मुददत संपून गेल्या नंतरही 200 पेक्षा जास्त BS4 इंजिनच्या गाडयांची फार मोठा टोल आकारून परस्पर वाहनांची नोंदणी करून घेतली सर्व कायदे व न्यायलयीन आदेशांची पायमल्ली करून नंदुरबार परिवहन अधिका-याने केलेल्या या हमकरेसो कायदयामुळे शासनाचा फार मोठया प्रमाणात महसूल बुडाता आहे.

वस्तुतः BS6 या पध्दतीचे इंजिन असणा-या गाडयांची नोंदणी करण्याचे आदेश मा. सर्वाच्च न्यायालयापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व कार्यालयांना आदेश दिले आहेत. प्रत्येक जुन्या गाडयांच्या BS4 इंजिनच्या वाहनांच्या नोंदणी करता. 5 लाख रूपये घेतल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्ष प्रदेश उपाअध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी केली आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

5 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

6 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

8 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

8 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

9 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

9 hours ago