राजकीय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

टीम लय भारी

 

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी २४ मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भरगच्च कार्यक्रम करण्यात आला असून, अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. (Anil Gote’s birthday Public service activities in Dhule)

अनिल गोटे यांचे धुळे शहराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी धुळ्यातील केंद्रबिंदू असलेले शिवतीर्थ, भीम तीर्थ, गुरु शिष्य स्मारक, अग्रसेन स्मारक बांधले. याशिवाय पांझरा चौपाटी येथे भव्य डिजिटल ग्रंथालयाची उपलब्धता करुन दिली. ज्यावेळी 29 दिवस धुळे शहराच्या नागरिकांचे पाण्याविना हाल होत होते. त्यावेळी भर उन्हात नैसर्गिक उताराने कोरडा नकाने तलाव भरून अनिल गोटे यांनी धुळेकरांची तहान भागवली. तसेच नदीकिनारी अतिशय सुंदर रस्ते केले. पांझरा नदीवरील ऐतिहासिक झुलता पूल, भगवान शंकराची भव्य पंचधातूची मूर्ती अशा अनेक ऐतिहासिक कामाचे शिल्पकार म्हणून अनिल गोटे यांची ओळख आहे.

 

 

धुळे शहरातील गोरगरीब गरजूंना लक्ष्मी कॅफे येथे शिवभोजन योजनेअंतर्गत अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव वामन तात्या मोहिते, वरिष्ठ उपाध्यक्ष श्रेया डॉक्टर अनिल पाटील सर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई आखाडे मोरे, प्रसिद्धी प्रमुख तथा सोशल मीडिया प्रमुख अविनाश भाऊ लोकरे, महिला आघाडीच्या उषाताई पाटील, सचिव दीपक भाऊ जाधव, धुळे ग्रामीण युवती अध्यक्ष हिमानी ताई वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते शकील भाई खजूरवाले, चीलू भाऊ आवळकंठे, सचिन भाऊ पोतेकर, प्रीतेश भाऊ अग्रवाल आदी उपस्थित होते.

याशिवाय धुळे शहरातील गोरगरीब गरजुंना एसटी स्टँड जवळही शिवभोजन योजनेअंतर्गत अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडियाचे मयूर भाऊ खैरनार यांच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी उपस्थित धुळे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष  डॉक्टर अनिल पाटील सर, धुळे ग्रामीण अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम भाई लंबू शेख,सचिव वामन तात्या मोहिते, सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई आखाडे मोरे, ज्येष्ठ राजू काका कोठावदे, अल्पसंख्यांकचे माननीय सय्यद सर,प्रसिद्धी प्रमुख तथा सोशल मीडिया प्रमुख अविनाश भाऊ लोकरे, अल्पसंख्यांक विभागाचे शिलेदार जावेद भाई किराणावाले,महिला आघाडीच्या उषाताई पाटील, सचिव दीपक भाऊ जाधव, धुळे ग्रामीण युवती अध्यक्ष हिमानी ताई वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते शकील भाई खजूरवाले,भटक्या विमुक्त जाती जमातीचे संतोष भाऊ गायकवाड, चीलू भाऊ आवळकंठे, सचिन भाऊ पोतेकर, मोहन भाऊ अमृतकर,प्रीतेश भाऊ अग्रवाल आदी उपस्थित होते अशी माहिती मयूर खैरनार यांनी दिली.

अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १२:३० वाजता धुळे शहराजवळील साखरेरोड येथील कुष्ठरोग आश्रम येथील अनाथ, कुष्ठरोगी गोरगरीब गरजुंना धुळे शहर कार्यकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने अन्नदान व फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

आज २४/५/२०२२ रोजी धुळे जिल्ह्यातील आस्थेचे आधारस्तंभ,केंद्रबिंदू असलेले अंजान शहा दाता सरकार येथे चादर अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजक धुळे जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक चे अध्यक्ष सलीम भाई लंबु शेख यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आला.

आमदार अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता धुळे शहरातील खानदेश गो शाळा येथे गाई व गोवंश यांना चारा वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 


हे सुद्धा वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

‘Sting operation’: NCP’s Gote lodges police complaint against Fadnavis

Pratiksha Pawar

View Comments

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

4 hours ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

5 hours ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

6 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

8 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

8 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

8 hours ago