राजकीय

पीएमआरडीच्या आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा, अँड आशिष शेलार यांचा आरोप

टीम लय भारी

मावळ : पीएमआरडीचा प्रस्तावित आराखडा जाहीर झाला असून त्यात १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप ऍड आशिष शेलार यांनी केले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे काढून खोट्या नामधारी शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्यासाठी निवासी जागा म्हणून सदर पत्ता जाहीर केला आहे (Ashish Shelar to put strong Allegation of Rs 1,000 crore scam in PMRD’s plan).

ही घटना मावळ प्रातांत घडली असून जवळ जवळ १ हजार कोटीइतका घोटाळा झाल्याचे समजते. कामशेत, मावळ  येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार आशिष शेलार उपस्थितीत होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती

मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखांचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास नक्की वाटतोय. असे ते यावेळी म्हणाले. सध्याच्या सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले, हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. एमपीएससी परीक्षेची तौरी करणाऱ्या स्वप्नील लोंकरला दिलेले वाचन सुद्धा ते पूर्ण करू शकले नाहीत ही या सरकारची दुर्दैवी बाब आहे.

महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे जे संकेत मिळत आहेत. या सर्वांचा अभ्यास केला तर असे अनुमान काढता येईल की,  राज्यात कधीही निवडणूक लागू शकतात, त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूका लागतील तेव्हा मावळमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणायचा आहे, असे उद्गार आशिष शेलार यांनी काढले.

अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Mumbai: Ashish Shelar demands formation of SIT to review decision of appointment of administrators in 500 buildings

शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी परिवाराची अंदाजे 1 हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली?  असा प्रश्न विचारून ते पुढे म्हणाले, हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

 

Mruga Vartak

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 hour ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

2 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

24 hours ago