राजकीय

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

टीम लय भारी

मुंबई : माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भर सभागृहात फिरकी घेतली. एकाच वाक्यात फिरकी घेताना थोरात यांनी जयकुमार गोरेंचे अज्ञानही उघडे पाडले (Balasaheb Thorat jibed on Jaykumar Gore).
माण (सातारा) तालुक्यात वाळूसंदर्भात झालेल्या एका कारवाईचा मुद्दा आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर अध्यक्षांनी उत्तर द्यावे, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली. ‘अध्यक्ष कसे काय उत्तर देतील?’ असा प्रतिप्रश्न करीत थोरात यांनी जयकुमार गोरे यांचे अज्ञान उघडे पाडले ( Balasaheb Thorat replied on Jaykumar Gore’s question).

प्रचलित पद्धतीनुसार विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने आमदार असलेले सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित करीत असतात. त्यावर विधानसभा अध्यक्ष संबंधित खात्याच्या मंत्र्यांना उत्तर देण्याची सुचना करतात. परंतु जयकुमार गोरे यांनी आपला प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर अध्यक्षांनाच उत्तर द्या अशी अज्ञानी मागणी केली. पण त्यावर बाळासाहेब थोरात यांनी नेमके बोट ठेवले, आणि ‘अध्यक्ष कसे उत्तर देतील’ अशा शब्दांत जयकुमार गोरे यांची फिरकी घेतली ( Balasaheb Thorat Said, how can president answer ?).

माणमधील वाळू तस्करीवरून गोरे, कूल आक्रमक !

माण तालुक्यातील वाकी या गावात वाळू तस्करीचे प्रकरण घडले होते. त्याची व्हीडीओ क्लिप आपण सादर करीत असल्याचे सांगत आमदार जयकुमार गोरे यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.नदीतून काही तस्कर पोकलेन, डंपर, जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरून नेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिथे पाच तलाठी कारवाई करण्यासाठी गेलेले दिसत आहेत. वाळू तस्कर हे तहसिलदार व जिल्हाधिकाऱ्यांचे नाव घेत आहेत. आम्ही तहसिलदार व जिल्हाधिकाऱ्यांना हप्ते देतो. त्यामुळे आमच्यावर कारवाई करू नका असे सांगताना दिसत आहेत. ते तस्कर तिथून तहसिलदारांना फोन लावत होते. पण फोन लागलेला दिसत नाही. त्यामुळे तहसिलदारांना निलंबित करावे, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

त्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विस्ताराने उत्तर दिले. वाळू तस्करी कशी चालते हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. २०१४ ते २०१९ या काळातही वाळूची प्रकरणे कशी होत होती, हे सुद्धा सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे वाळू तस्कर व्हिडीओमध्ये जे काही बोलत आहेत, त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ? तस्करांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अधिकाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही.
परंतु जयकुमार गोरे यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या अनुषंगाने या प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग होता किंवा नाही याची चौकशी विभागीय आयुक्त करतील, असे आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिले. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचेही नाव घेतलेले आहे. म्हणून विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे थोरात म्हणाले (Balasaheb Thorat said, Divisional commissioner will be appointed for sand baron).

थोरात यांच्या उत्तरानंतरही जयकुमार गोरे यांनी तहसिलदारांना निलंबीत करा या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. गोरे यांच्या मदतीला आमदार राहूल कूल व आमदार अतुल भातखळकर धावून आले.वाळू तस्करावर विश्वास ठेवता येणार नाही. परंतु वाळू तस्कर आणि अधिकारी यांच्यात संगनमत असल्याशिवाय असे प्रकार घडतच नाहीत. त्यामुळे तहसिलदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राहूल कुल यांनी केली.अतुल भातखळकर म्हणाले की, महसूल मंत्री म्हणून तुम्ही पॉवरफुल आहात. तुम्हांवर कोणाचा दबावही नसतो. तुम्ही निर्णय घेणारे मंत्री आहात. मग असे असताना तहसिलदारांना तुम्ही निलंबित करायला हवे.

त्यावर बाळासाहेब थोरात यांनी पुनश्च उत्तर दिले. तहसिलदारांवर जे आरोप आहेत. त्या आरोपांची चौकशी विभागीय आयुक्त करतील. विभागीय आयुक्त हा मोठा अधिकारी असतो. विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत जर तहसिलदार दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव ऐकताच अजित पवारांची सटकली

शिवसेनेने आमदार जयकुमार गोरेंना झोडपले

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

श्रीरामांविषयी अभद्र बोलणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसने फटकारले

Nagpur | कळमेश्वर सिटी सर्व्हे घोटाळा प्रकरण, महसूल मंत्री Balasaheb Thorat यांचे पुनर्तपासणीचे आदेश

आता नंबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

अजित पवारांनी प्रवीण दरेकरांना निरोप दिला, अन् शाब्दीक फटकेबाजी करीत खिल्लीही उडविली
Pratiksha Pawar

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago