33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयभाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

तुषार खरात ( संपादक, लय भारी ) 

माण – खटावचा भाजपचा आमदार जयकुमार गोरे हा अत्यंत गलिच्छ वृत्तीचा मनुष्य आहे. आज त्याने आपल्या पिलावळीला हाताशी धरून माझी बदनामी केली. ( Tushar Kharat scathing to MLA Jaykumar Gore ). या जयकुमार गोरेने त्याचा पीए अभिजीत काळे याच्याकरवी अत्यंत खोटारडा, तसूभरही तथ्य नसलेला एक मेसेज व्हायरल केला आहे. 

मुळातच भाजपच्या या आमदाराने प्रभू श्रीरामाची ‘नियत खराब होती’ असे ठासून विधान केले आहे. जो आमदार श्रीरामावर आरोप करतो, त्याने माझ्या सारख्या सामान्य पत्रकारावर आरोप केले तर नवल ते काय ? श्रीरामाची बदनामी करणारा, आणि प्रत्यक्षात रावणाचा अवतार असलेल्या या नालायक जयकुमार गोरेला शब्दांचा मार देणे आवश्यक आहे. त्यानेच दिलेल्या मेसेजला प्रत्युत्तर म्हणून मी हा लेखन प्रपंच करीत आहे.

खरंतर, हा आमदार जयकुमार गोरे, स्त्रीलंपट, घोटाळेबाज म्हणून माण – खटावच्या जनतेला माहीत आहे. त्याच्यावर अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण नितिमत्ता घसरलेला हा मनुष्य आहे. त्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात त्याने घोटाळे केले आहेत. एवढेच काय, ‘कोरोना’चे रूग्ण व मृत व्यक्ती यांच्या नावावर बोगस रक्कमा हडपल्या आहेत. सरकारकडून त्याची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा सुरू आहे.

या घोटाळेबाज गोरेचे एकापेक्षा एक घोटाळे मी सतत बाहेर काढत असतो. ता. ३१ ऑगस्ट रोजी तो श्रीरामाविषयी अभद्र बोलला. समस्त हिंदू जनतेचे दैवत असलेल्या ‘रामा’विषयी त्याने केलेले विधान आम्ही व्हिडीओसह जसेच्या तसे प्रसिद्ध केले. त्यात तो स्वतःच्या मुखातूनच जे काही बोलला ते आम्ही दाखविले आहे.

खरंतर, त्याचा हा व्हिडीओ दुपारपासून सगळीकडे व्हायरल होतोय. सोशल मीडियातून हा व्हिडीओ सगळेजण बघत आहेत. माण – खटावमधील अनेक लोकांचे मला फोन आले. जयकुमार गोरे याच्या विरोधात कुणीही लिहायचे धाडस करीत नाही. तुम्ही हा व्हिडीओ दाखवा. किंबहूना अनेक पत्रकार मित्रांनीही मला फोन केला. आम्ही काही लिहिले तर गोरे व त्याची पिलावळ आम्हाला त्रास देईल. तुम्ही मुंबईत असता. तुम्हाला त्रास देण्याइतकी त्याच्यात व त्याच्या पिलावळीमध्ये हिंमत नाही. त्यामुळे तुम्ही जरा या व्हिडीओचे काहीतरी बघा.

माण – खटावमधील सामान्य जनता, व माझ्या पत्रकार मित्रांच्या विनंतीवरून ‘लय भारी’ने हा व्हिडीओ आमच्या ‘लय भारी’ चॅनेलवर अपलोड केला. आरसा दाखविण्याचेच काम पत्रकार म्हणून आम्ही केले (Tushar Kharat scathing to MLA Jaykumar Gore )

पण जयकुमार गोरे, तू कंबरेखालच्या वार करणाऱ्या शब्दांत एका पत्रकाराविषयी लिहितो. तुला लाज वाटायला पाहीजे. मी माण – खटावमधील एका देशमुखांवरही झणझणीत व्हिडीओ तयार केला आहे. हे देशमुख तुझे विरोधकच आहेत. तुझ्यावर टीका केलीय, त्यापेक्षा जास्त टीका त्या देशमुखांवर केली आहे. पण त्या देशमुखांनी पत्रकारितेचा मान ठेवला. तुझ्याप्रमाणे गाढवासारख्या लाथाळ्या झाडल्या नाहीत. त्या देशमुखांच्या समर्थकांचेही फोन आले. पण त्यांची भाषा सभ्य होती. एवढे धाडस टुकार पत्रकार करीत नाही. राहता राहिला प्रश्न प्रभाकर देशमुखांचा. माझी लेखणी मी प्रभाकर देशमुखांच्या चरणी वाहिलेली नाही. मी तुला आजच सांगतो, भविष्यात जर प्रभाकर देशमुख आमदार झालेच, तर त्यांच्या चुकांवर अशाच किंबहूना यापेक्षाही जहाल शब्दांत लिहीन.

हाच तो व्हिडीओ, ज्याच्यामुळे जयकुमार गोरेचे पित्त खवळले. याच व्हीडीओत आमदार गोरेने श्रीरामाविषयी मुक्ताफळे उधळली आहेत.

तू आमदार आहेस ( आणि बदमाश सुद्धा ). कायदेमंडळाचा सदस्य आहेस. तू संवैधानिक पदावर कार्यरत आहेस म्हणून तुझ्यावर झोड उठविणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे. तुला पटले नाही, तर सनदशीर मार्गाने तू खुलासा करू शकतोस. पण मेंदूचा वापर न करता तू काहीही लिहितोस, अन् तुझ्या पिलावळीकरवी माझ्यावर खोटारडे आरोप करीत सुटतो. स्वतःची लाज तू सोडलीच आहेस. पण लोकशाहीचे पवित्र मंदीर असलेल्या कायदेमंडळाची, म्हणजेच विधानसभेची तरी लाज बाळग. लोकशाहीच्या पवित्र मंदीराचा तू सदस्य आहेस. घाणेरड्या मार्गाचा अवलंब करतोस कशाला ?.

माझ्यावर जे आरोप केलेस ते तुला लागू होतात. कारण बायकांसोबतची लफडी तूच केली आहेस. जामीन मिळविण्यासाठी पार्श्वभागाला पाय लावून तू कसा फरार झाला होतास हे सगळ्यांना माहीत आहे. तू किती घोटाळेबाज आहेस हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. माझ्यावर तुझ्यासारख्या लंपटांनी खोटे आरोप केले, म्हणून मी तुला घाबरतो की काय ?. माझ्यावर आरोप करताना मेंदू शाबूत ठेवून तरी आरोप करायचास ना. तू कायदेमंडळाचा सदस्य आहेस. तुला अक्कल तरी पाहिजे की कायद्याच्या चौकटीवर टिकेल असाच आरोप करावा (Tushar Kharat scathing to MLA Jaykumar Gore ).

तू खारघर, पनवेलला जमिनीचे काय घोटाळे केले होतेस त्याच्या बातम्या मी पुराव्यासहीत प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावेळी सुद्धा तू अशाच गाढवाप्रमाणे लाथा झाडल्या होत्या. तुझा चेहरा टराटरा फाडण्याचे काम मी नेहमीच करतो. तुझ्या विरोधात मी लिहायला लागलो की व तुझी पिलावळ कंबरेखालचे वार करू लागते. तू कायदेमंडळात काम करतो. तुला अक्कल पाहीजे की, आरोप करावा तर किमान हातात कागद घेऊन तरी करावा.

हे सुद्धा वाचा

माणचे आमदार वापरतात नोंदणी नसलेली गाडी (सरकारनामा)

आमदार जयकुमार महिला विनयभंग प्रकरण, उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला (जय महाराष्ट्र )

जयकुमार गोरेवर दाखल असलेले गुन्हे, त्याची संपत्ती

जयकुमार गोरेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल (महाराष्ट्र टाइम्स )

जयकुमार गोरे, शेखर गोरे यांच्यावर दगडफेकीचा गुन्हा (लोकसत्ता)

जयकुमार गोरेवर शिवीगाळ व दमदाटीचा गुन्हा ( सातारा टुडे)

जयकुमार गोरेने मध्यरात्री जाऊन दिली जीव मारण्याची धमकी (तरूण भारत)

भाजप आमदाराचा कोविड सेंटरमध्ये धिंगाणा ( लय भारी )

आमदार जयकुमार गोरेसह तिघांना तीन वर्षांची शिक्षा

जयकुमार गोरे बावळटा, तुला माझे आव्हान आहे. तुझ्यात हिंमत असेल तर ‘वैचारीक लढाई माझ्याशी विचाराने लढ’. कंबरेखालचे वार करून नकोस. तुझ्या पाळीव कुत्र्यांना माझ्यावर भुंकायला सोडू नको. ज्या लोकांना मेंदू नाही, अशांना माझ्यावर भुंकायला कशाला सोडतोस रे ?

अरे मुर्खा, तू तुझे राजकारणात जसे इमान विकले आहेस, तसे आम्ही आमचे इमान विकलेले नाही. प्रभाकर देशमुखांचे नाव घेऊन तू माझ्यावर आरोप करतोस तुला लाज वाटायला पाहीजे.

प्रभाकर देशमुख एक सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती आहे. त्यांनी माझ्या शब्दाला मान देवून माझ्या पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी या चार गावांमध्ये जलसंधारणाची भरपूर कामे केली. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला. प्रभाकर देशमुख यांनी माझ्या गावात कामे केली ही तुझी खरी पोटदुखी आहे.

तुला आठवत असेल. तुझा भाऊ शेखर गोरे यांच्यावर मी लिखाण केले होते. गोरे यांच्यावर त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी तर तू अनेक लोकांच्या समोर म्हणाला होतास ‘तुषार खरात हा वाघ आहे.’ म्हणजे, तुझ्या सख्ख्या भावाच्या विरोधात मी भूमिका घेतली तेव्हा तुला मी वाघ वाटत होतो. आता तुझ्या विरोधात गेलो तर मी टुकार झालो. वा रे वा बहाद्दरा.

मुर्खा, तू आमदार आहेस. पण तुझी भाषा एखाद्या गुंडाप्रमाणे आहे. तुझे मतदार तुला भेटायला येतात तेव्हा ते तुझे गुलाम आहेत अशा थाटात तू त्यांच्याशी बोलतोस.

तू थोडी तरी लाज बाळग. तू ज्या पक्षात आहेस, तो एक सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. माझ्यावर ज्या भाषेत तू तुझ्या पीएकडून मेसेज व्हायरल केलेस, ती भाषा तुझ्या पक्षाला तरी मान्य आहे का ?

बावळटा, माझे पोर्टल, यू ट्यूब चॅनेल बघ. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशा सगळ्यांवरच आम्ही टीका करतो. चांगलं असेल तर चांगलंही लिहितो. गाढव लाथा झाडतं, तसा तू माझ्यावर आरोप करतोस. तुला लाज वाटायला पाहीजे. लोकशाहीमुळे तू एका जबाबदार पदावर आहेस. या पदाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करण्याऐवजी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी व माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराची निंदानालस्ती करण्यासाठी करतोस. तू माझी मानहानी केली आहेस. त्याविरोधात मी कायदेशीर पातळीवर लढेनच (Tushar Kharat scathing to MLA Jaykumar Gore ).

मला तू टुकार पत्रकार म्हणतोस ना. तू काय घोटाळे केलेस ते मी यापूर्वी जनतेसमोर आणले आहेत. तू खारघर व पनवेलमध्ये बेनामी जमिनी हडपल्या आहेत. एक वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा हडपले आहेस. तुझे हे भ्रष्टाचार मी चव्हाट्यावर आणले. ते सुद्धा पुराव्यासहीत. तुझ्या भ्रष्टाचारावर मी सातत्याने लिहित असतो. तुझ्या ताटाखालचे मांजर होवून मी पत्रकारिता करीत नाही. त्यामुळेच तुला मी टुकार पत्रकार वाटत असावा. पण तुझ्यासारख्या गुंड प्रवृत्तीच्या तिनपाट व्यक्तीचे व तुझ्या पिलावळीचे पित्त खवळले हेच आमच्या पत्रकारितेचे यश आहे.

अन् तुला पुन्हा एकदा आव्हान देतो. पाळीव कुत्र्यांना माझ्यावर भुंकायला सोडू नकोस. हिंमत असेल तर ‘विचाराची लढाई विचाराने कर.’

तूर्त एवढ्यावरच थांबतो.

( वाचकहो, आमदार हे लोकशाहीच्या पवित्र मंदीराचे सदस्य असतात. त्यांना मुर्ख, नालायक म्हणणे योग्य नाही. त्यांचा एकेरी उल्लेख करणे सुद्धा योग्य नाही. पण आमदार जयकुमार गोरे यांनीच लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचे भान ठेवलेले नाही. त्यामुळे या गुणउधळ्या आमदाराला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी