37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशिवसेनेने आमदार जयकुमार गोरेंना झोडपले

शिवसेनेने आमदार जयकुमार गोरेंना झोडपले

टीम लय भारी

मुंबई : साताराच्या माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी काल प्रभू रामचंद्राबाबत केलेल्या विधानावरुन अडचणीत आले आहेत. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेला भाजप विरोधात चांगलाच मुद्दा सापडला आहे (Shiv Sena slapped MLA Jayakumar Gore).

भगवान प्रभू रामचंद्रांचा भर सभेत अपमान करणारे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा शिवसेना पक्षाने जाहीर निषेध केला आहे. तसेच भाजपच्या सर्व आमदारांना रामायण ग्रथांचे पठण करण्याची गरज असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर डॉ. मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे.

रामायण – महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्याची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही डॉ. मनीषा कायंदे यांनी दिला आहे (Even such a hint, Dr. Contributed by Manisha Kayande).

श्रीरामांविषयी अभद्र बोलणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसने फटकारले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका, खंडणी व जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश

प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. ऐकिव माहितीवर आपले चुकीचे ज्ञान देऊन महापुरुषांचा अपमान करू नये.

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

maharashtra: After raid, Shiv Sena MP seeks ED action against BJP MLA

“मी असतो तर” ब्रँडेड कोकणचे खासदार आता गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का? असा सवालही डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे. प्रभू श्रीराम – रावण बिभीषण हे रामायणात होते का महाभारतात हे माहित नसलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी