राजकीय

अजितदादा हे जनतेच्या मनातील ‘दादा’ : दत्तात्रय भरणे

टीम लय भारी

मुंबई :- सत्ता असो वा नसो अजितदादा नेहमीच जनतेसाठी काम करतात. अजितदादा हे जनतेच्या मनातील ‘दादा’ आहेत, अशी भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांनी ‘लय भारी’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या (Dattatraya Bharane expressed his feelings for Dada birthday).

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रशासनातील जबरदस्त पकड, आक्रमकता, रोखठोपणा, स्पष्टवक्तेपणा या अष्टपैलू गुणांमुळे अजितदादा राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आयडॉल आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादांनी 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार आपली वाटचाल सुरू ठेवली आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

रोहित पवारांनी अजितदादांचा खास गुण सांगत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांनी अत्यंत गतिमान प्रशासन दिले. कोरोनाच्या काळातही त्यांनी कामाचा धडाका कायम ठेवला. कोणतीही कामे व फायली विनाकारण रखडत ठेवल्या नाहीत. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ व नियोजन खात्याचा कारभार सांभाळत असताना कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे अनेक आव्हाने होती, मात्र दादांनी या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी दादांनी आम्हा मंत्र्यांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. 18-18 तास काम करून सकाळी सात वाजता जनता दरबारात अजिबात न थकता प्रचंड उत्साहाने अजितदादा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी कामाचा धडाका कायम ठेवला. कोणतीही कामे व फायली विनाकारण रखडत ठेवल्या नाहीत. त्यामुळे सामान्यांच्या व्यथा जाणणारे हे खरेखुरे दादा आहेत. असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत (By saying this, Bharne has expressed his feelings).

दादांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अजितदादा एक बहुआयामी आणि पारदर्शक राजकीय व्यक्तिमत्व आहे. सत्ता असो अथवा नसो, दादांची लोकप्रियता महाराष्ट्रात कायम आहे. सत्तेत नसतानाही दादांभोवती नेहमी आढळणारा कार्यकर्त्यांसह जनतेचा समूह त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची साक्ष देतो. शरद पवार यांच्या स्वप्नातील पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

अजितदादांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात

खरंतर अजितदादांची राजकीय कारकीर्द इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली. गेल्या 25 वर्षात कृषी, फुलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा ही खाती सांभाळताना त्यांनी प्रत्येक खात्यावर आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे, असे भरणे म्हणाले.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराच्या या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर कसे ठेवता येईल, यासाठी अजितदादांनी घेतलेले अनेक महत्वपूर्ण निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या न्यायासाठी दादांची नेहमी तळमळ असते.सामान्यांच्या प्रश्नाला त्यामुळेच दादा प्राधान्य देत असतात, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, साहित्य, क्रीडा, ऊर्जा, शेती, उद्योग याची खडानखडा माहिती दादांना असते. शरद पवारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर वेगळी छाप निर्माण केलेली आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

As Supporters Go to Town With Birthday Hoardings for Ajit Pawar, Fadnavis, Dy CM Says ‘How’s it My Fault’

अजितदादांकडून खूप काही शिकायला मिळाले

अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी मला शिकण्यास मिळाल्या. माझ्याही राजकीय जीवनाची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची अनेक वर्षे जबाबदारी त्यानंतर या बँकेचे अध्यक्षपद मला मिळाले. हे केवळ शरद पवार व दादा यांच्यामुळे शक्य झाले, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

दत्तात्रय भरणे आणि अजित पवार

मिळालेल्या पदाचा उपयोग नेहमी सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण करत आलो आहोत, हीच शरद पवार व दादांची आम्हाला शिकवण आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम, वने, मृद, जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यासह सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. शरद पवार व अजितदादांचे नेहमी मार्गदर्शन मला असते, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे

अजितदादा नावाप्रमाणेच दादा आहेत

महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. खरोखरच अजितदादा नावाप्रमाणेच दादा आहेत. मोठ्या भावाप्रमाणे त्यांची सदैव साथ व मार्गदर्शन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सदैव मिळालेली आहे, अशा या अष्टपैलू नेतृत्वाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना आहे (May this all-round leadership enjoy good health and longevity).

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago