29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयफडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली...

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

टीम लय भारी

मुंबई :- राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. एसआयटी नेमून या दौऱ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केली आहे (Sudhir Munguntiwar has demanded an inquiry into the visit).

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील पाच जणांचे शिष्टमंडळ इस्त्रायल दौऱ्यावर गेले होते. या पाच जणांनी तिथे हेरगिरी, फोन टॅपिंगचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे.

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

वर्षभरापूर्वीच हे प्रकरण उघडकीस आले आहे. आता पेगॅससच्या निमित्ताने पुन्हा या प्रकरणाला वाचा फुटली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या प्रकरणावरून भाजपवर तोफ डागण्यास सुरूवात केली आहे (The Congress has started firing on the BJP over this issue).

Sudhir Munguntiwar has demanded an inquiry into the visit
सुधीर मुनगुंटीवार

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

Jalyukta Shivar Abhiyan: Panel for probe into works under Fadnavis govt

भाजपकडूनही उलट प्रतिक्रिया दिली जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पाच जणांच्या शिष्टमंडळाबद्दल सरकारने एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी मुनगुंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

सन २०१९ च्या दौऱ्यात सरकारला काही काळंबेरं वाटत असेल तर सरकारने खुशाल चौकशी करावी, त्यासाठी एसआयटी नेमावी असे सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी