राजकीय

भाजपच्या मंत्र्याचे अनोखे स्वागत, हवेत झाडल्या गोळ्या

टीम लय भारी

बिदर: देशाभरात भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. कर्नाटकातील बिदर येथे काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत भाजपच्या गुडयांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारतून भाजप जनतेमध्ये दहशत निर्माण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे (BJP has opened fire on JanaAashirwad Yatra).

कर्नाटकातील बिदर येथे भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे भाजप कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करून स्वागत केले आहे. यात्रेत गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात्रेत गोळीबार करून भाजपला जनतेमध्ये दहशत निर्माण करायची आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

भाजप आयोजित करणार ‘पोलखोल’ सभा

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

या यात्रेत केलेल्या गोळीबारातील 4 शस्त्रांपैकी 2 शस्त्र ही विनापरवाना आहेत. भाजपकडे विनापरवाना शस्त्र आहेत. या शस्त्रांच्या जोरावर भाजप जनतेला भयभीत करत आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांकडे विनापरवाना शस्त्र आहेत, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे (BJP has unlicensed weapons).

मोदी सरकारकडे थोडीतरी नैतिकता असेल तर, त्यांनी भगवंत खुबा यांचा ताबडतोब राजिनामा घ्यावा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तपासे यांनी ट्विट करत केली आहे.

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

Narayan Rane: BJP will win Mumbai civic polls

गोळीबारातील 4 शस्त्रांपैकी 2 शस्त्र ही विनापरवाना

भाजपाचे गुंड उघडपणे शस्त्राचा वापर करत आहेत. भाजपला कायद्याची भीती राहिलेली नाही. अशा प्रकारांमुळे उपस्थितांच्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र याची भाजपच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांना चिंता नाही. यात्रेत पोलीसही होते, मात्र त्यांनी त्यावेळी कोणतीच कारवाई केली नाही. पोलिसांनी विनापरवाना असलेल्या बंदुका का जप्त केल्या नाहीत, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे (BJP goons are openly using weapons)

ही लोकशाही आहे की येत्या काळातील भाजपच्या राजवटीतील परिस्थितीची झलक आहे, असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तींकडून असे कृत्य अपेक्षित नाही. तसेच ते माफीयोग्य देखील नाही. खुबा यांनी या चुकीची जबाबदारी स्वीकारत त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

1 hour ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

4 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago