राजकीय

‘भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही’

टीम लय भारी

मुंबई : आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधल्याची माहिती समोर आली. परंतु आता शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांच्याकडून या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. भाजपा लबाड आहे, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याला किंवा व्यक्तीला फोन केला नसल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली सत्ता धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली. परंतु उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क साधलेला नाही. ही भाजपची कूटनीती असून, भाजपकडून ही फालतुगिरी करण्यात येत आहे. शिवसेना भाजप करत असलेल्या कोणत्याही गोष्टींना भीक घालणार नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

आम्ही शिवसैनिक येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ. भाजप लबाड आहे. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून पसरविण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात, ते खुलेआम बोलतात. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. असे विनायक राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

फुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

2 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

2 hours ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

2 hours ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

3 hours ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

3 hours ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

3 hours ago